12.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeताज्या बातम्यामहाविकास आघाडीने लढण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार!

महाविकास आघाडीने लढण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार!



पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक तयारीचा वेग वाढवला असून, पक्षाची ५२ वी मासिक आढावा बैठक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती अथवा आघाडी न करण्याचा ठाम निर्णय जाहीर केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच इतर समविचारी पुरोगामी गटांसोबत महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढण्याची पक्षाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आली.

महायुतीने पुणे शहराचे ट्रॅफिक, वाढती गुन्हेगारी आणि शहरातील बकालपणा या स्वरूपात मोठे नुकसान केले असून, धार्मिक तेढ वाढविण्याचे राजकारण केल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. “अशा धर्मांध व विद्वेषी तत्वांसोबत जाणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राची पताका खांद्यावर घेऊन पुण्याला पुन्हा एकदा सुसंस्कृत, सुनियोजित आणि विकासाभिमुख शहर बनवू,” असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

यावेळी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. इच्छुकांनी पक्ष कार्यालयातून अर्ज घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले.

बैठकीला आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष रवींद्रअण्णा माळवदकर, श्री. प्रकाश मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
12.1 ° C
12.1 °
12.1 °
62 %
1.5kmh
0 %
Tue
14 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!