29.2 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeताज्या बातम्या१०० दिवस सुधारणा कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेला राज्यात द्वितीय क्रमांक

१०० दिवस सुधारणा कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेला राज्यात द्वितीय क्रमांक

महानगरपालिकेच्या वतीने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्वीकारले प्रमाणपत्र, मंत्रालयात पार पडला विजेत्यांचा गुणगौरव सोहळा

मुंबई, – : महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त श्रेणीत’ संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल आज, बुधवारी (७ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्तांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.आयुक्त शेखर सिंह यांच्या वतीने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

मुंबई येथील मंत्रालयात मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त विठ्ठल जोशी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ या उपक्रमाचे अंतिम मूल्यमापन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त श्रेणीत’ संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. महानगरपालिकेच्या विविध सेवा, सुविधा नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने प्रामुख्याने डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता व तत्पर सार्वजनिक सेवा देण्यास प्राधान्य दिले होते. आता या उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळाल्याने या क्षेत्रात महानगरपालिकेने एकप्रकारे स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे.

चौकट

राज्यातील ४८ विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश

महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ मध्ये राज्यातील ४८ विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होता. या उपक्रमाचे गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या अंतिम मूल्यमापनात महापालिका श्रेणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १०० पैकी ८५.७१ गुण मिळाले आहेत. तर, उल्हासनगर महापालिकेला (८६. २९ गुण) अवघ्या काही गुणांनी प्रथम क्रमांक मिळाला आहे.

………
चौकट

संकेतस्थळ सुसज्ज करण्यासह विविध बाबींवर दिला भर

‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध बाबींवर भर दिला होता. यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, महानगरपालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे, महानगरपालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणे, उद्योजकांसाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे आदींचा समावेश होता. याशिवाय एआय आधारित तक्रार निवारण यंत्रणा, जीआयएस आधारित मालमत्ता कर सुधारणा, स्मार्ट सेवा सुविधा, नागरी सेवा प्रतिसाद वेळ सुधारण्यासाठी अंदाजाधारित विश्लेषण प्रणाली असे महानगरपालिकेने राबवलेल्या विविध उपक्रमांची देखील
गुणवत्ता परिषदेने अंतिम मूल्यमापन करताना दखल घेतली.

…….

कोट

महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत मिळालेला द्वितीय क्रमांक महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे यश आहे. या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या विविध विभागांचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक गतिमान व नागरिकाभिमुख करण्यास प्राधान्य देण्यात आले. डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा यावरही भर देण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘कटिबद्ध जनहिताय’ या ब्रीदवाक्यानुसार कार्य सुरू असून आगामी काळातही नागरिकांप्रती आमची कटिबद्धता कायम राहील.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

……

कोट

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व विभागात ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ राबवण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले आहे. ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रमात’ मिळालेला द्वितीय क्रमांक ही महानगरपालिकेच्या सर्वच विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, प्रभारी आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
3.2kmh
18 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!