27.3 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवड महापालिका झाली १००% डिजिटल

पिंपरी चिंचवड महापालिका झाली १००% डिजिटल

देशातील पहिल्या स्मार्ट प्रशासनात वाटचाल

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या कामकाजात ऐतिहासिक परिवर्तन घडवत १ एप्रिल २०२५ पासून शंभर टक्के कागदविरहित प्रशासनाची अंमलबजावणी केली आहे. या डिजिटल क्रांतीमुळे महानगरपालिकेचे सर्व ५४ विभाग आता पूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत झाले असून, ही पायरी देशात स्मार्ट प्रशासनाकडे वाटचाल करणाऱ्या आघाडीच्या यंत्रणांमध्ये महत्त्वाची ठरली आहे.

महानगरपालिकेच्या वतीने दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (Document Management System – DMS) आणि वर्कफ्लो प्रणाली (Workflow – WF) चा वापर करून एप्रिल महिन्यापासून ३१ हजारांहून अधिक कागदपत्रे आणि ३,७१६ फाईल्सचे व्यवहार पूर्णपणे डिजिटल स्वरुपात पार पडले आहेत.


डिजिटायझेशनमुळे काय झाले बदल?

पूर्वीचे पारंपरिक कागदोपत्री व्यवहार हे आता पूर्णतः बंद झाले असून, प्रत्येक दस्तऐवज स्कॅनिंग, ट्रॅकिंग आणि सामायिकरणाच्या सोयीसह प्रणालीमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केला जात आहे. यामुळे कामाच्या पारदर्शकतेत वाढ झाली असून, फाईल्सच्या वेळेवर मंजुरी आणि कार्यवाही देखील अधिक गतिमान झाली आहे.


सॅप आणि जीआयएसमुळे व्यवहार आणखी जलद

महानगरपालिकेतील सॅप (SAP) प्रणाली द्वारे ६,५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन व ठेकेदारांचे बिले डिजिटल स्वरुपात वितरीत करण्यात आले आहेत. याचबरोबर जीआयएस (GIS) आधारित अंदाजपत्रके, रिअल टाइम ट्रॅकिंग, मालमत्ता नोंदणी, विवाह नोंदणी, मैदान आणि सभागृह बुकिंगसारख्या नागरी सेवा देखील डिजिटल माध्यमातून चालविल्या जात आहेत.


ई-गव्हर्नन्समध्ये पिंपरी चिंचवडचा टॉप-लेव्हलचा प्रवेश

महानगरपालिकेच्या प्रयत्नांमुळे आता ३८० हून अधिक जीआयएस लेअर्स, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, ६ लाखांहून अधिक जिओ-टॅग मालमत्ता आणि प्रधानमंत्री गतिशक्ती पोर्टलशी जोडलेली माहिती या सगळ्यांचा वापर शहरी नियोजनासाठी करण्यात येत आहे.

यामुळे नागरिकांना कोणतीही सेवा मिळवण्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज उरलेली नाही. ऑनलाइन सेवा पोर्टलवरूनच सर्व माहिती व व्यवहार करता येत असल्यामुळे वेळ, पैसा आणि कागदाचा खर्च वाचत आहे.


डिजिटल क्रांतीचे ठळक फायदे

  • ५४ विभागांमध्ये १००% डिजिटल व्यवहार
  • ८,७४२ ईमेल्स ई-ऑफिसद्वारे पाठवले
  • १,७०९ डिजिटल सिग्नेचर की तयार
  • सिंगल साइन ऑन (SSO) प्रणाली व एकत्रित डॅशबोर्ड उपलब्ध

“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागात आता फिजिकल फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात पाठवण्याची गरज उरलेली नाही. यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख झाले आहे. ही केवळ डिजिटल नव्हे तर कार्यक्षमतेची क्रांती आहे.”
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.3 ° C
27.3 °
27.3 °
88 %
3.7kmh
100 %
Mon
27 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!