6.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeताज्या बातम्याभाजपा मजबूत : पिंपरी चिंचवडमध्ये "कमळ"च फुलणार!

भाजपा मजबूत : पिंपरी चिंचवडमध्ये “कमळ”च फुलणार!

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा विश्वास

– आगामी महापौर भाजपाचाच असेल, असाही केला दावा

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या माध्यमातून विकासाची गंगा आली.  समाविष्ट गावांमध्ये अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली. प्रशस्त रस्ते चांगल्या मूलभूत सुविधा व सार्वजनिक वाहतूक सेवेला प्राधान्य यामुळे नागरिकांनी पिंपरी-चिंचवड शहराला निवासी करण्यासाठी पसंती दिली हे वाढत्या गृहनिर्माण संस्थांमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिक भाजपा सोबतच राहतील. महापालिकेत भाजपचाच महापौर असेल, असा विश्वास भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अखेर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याचे आता स्पष्ट झाले आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ‘जैसे थे’ ठेवून येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जाहीर करा, असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड ही उद्योग नगरी आहे. अनेकांच्या हाताला काम देणारे औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे या शहरात येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. प्रशस्त रस्ते असतील आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक मिळेल या दृष्टीने नियोजन करण्यात आले. 2014 नंतर या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा अवतरली आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये साडेबारा टक्के परतावा देऊन भूमिपुत्रांना न्याय दिला. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी
आंद्रा आणि भामा आसखेड धरणांमध्ये पाणी आरक्षित केले. अतिरिक्त पाणी आपल्याला उपलब्ध झाले. निगडी ते पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर असा मेट्रोचा मार्ग प्रशस्त केला. संविधान भवन, संतपीठ, आरटीओ, न्यायालय संकुल, धर्मवीर संभाजी महाराजांचा सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा, औद्योगिक प्रदर्शन केंद्र अशा अनेक योजनांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर प्रगतीपथावर आणले आहे. त्यामुळे नागरिकांचा भाजपावर मोठा विश्वास आहे. भाजपाच्या कामाची पोचपावती नागरिक देणार आहेत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
**

टीपी स्कीम रद्द करण्यासाठी पाठपुरावा!

नगर नियोजन योजनेवरून (टीपी) सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.भूमिपुत्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे. प्रशासकीय राजवटीत असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. याबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. चिखली, कुदळवाडी, चऱ्होली संदर्भात कोणत्याही प्रकारचा टीपी लादला जाऊ नये. हा रद्द व्हावा अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. 2019 मध्ये महापालिका सभेच्या मान्यतेनुसार “टीपी “ची अंमलबजावणी सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. आगामी सहा महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये या पुढील काळात अशा प्रकारे मनमानीपणे निर्णय लादता येणार नाही, अशी नियमावली करणार आहोत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
***

सर्वोच्च न्यायालयाने  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानतो. गेल्या दहा वर्षांमध्ये शहरांमध्ये भाजपाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा नियोजनबद्धरित्या विकास झाला. या शहरातील नागरिकांना आणि भूमिपुत्रांना न्याय देत शहर विकासाची भूमिका ठेवली आहे ती आगामी काळातही तशीच राहील. संघटनात्मक पातळीवर पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलेल यात शंका नाही.

महेश लांडगे
आमदार, भाजपा,  पिंपरी-चिंचवड, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
6.1 ° C
6.1 °
6.1 °
100 %
2.1kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!