28.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeताज्या बातम्यानिसर्गछाया उपक्रम कोथरुड सह सर्वांसाठी खुला

निसर्गछाया उपक्रम कोथरुड सह सर्वांसाठी खुला

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पुणे- कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला होता. मात्र, अल्पवधीत हा उपक्रम अतिशय लोकप्रिय झाला. राज्यातील विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांकडून या उपक्रमाबाबत विचारणा होत होती. त्यामुळे या उपक्रमाचा प्रतिसाद पाहता, कोथरुडसह इतरांनाही याचा लाभ घेता येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या निसर्ग छाया उपक्रमाने लाभार्थ्यांचा दहा हजारचा टप्पा नुकताच पूर्ण केला. त्या अनुषंगाने कोथरुड मधील पंडित फार्म येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ना. पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, निसर्गछाया उपक्रमाचे संयोजक मंदार देवगावकर, अमृता देगावकर, नवचैतन्य हास्य योगचे मकरंद टिल्लू, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील ज्येष्ठ नागरिकांना लांबचा प्रवास शक्य नसल्याने सहलीचा आनंद लुटता यावा; यासाठी दीड वर्षापूर्वी कोथरुडपासून काही अंतरावर असलेल्या भूगाव येथे निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम सुरू करताना, एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विचार केला नव्हता. मात्र पुण्यासह, रत्नागिरी वगैरे अनेक जिल्ह्यांतूनही यासाठी चौकशी होत होती. कोथरुड मधील या उपक्रमाच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे याची क्षमता देखील वाढविली आहे. त्यामुळे आता कोथरुडसह इतर ठिकाणच्या ज्येष्ठांना याचा लाभ घेता यावा; यासाठी हा उपक्रम सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, कोथरुड मतदारसंघात विविध २२ लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत. याचे प्रकटीकरण आणि सर्वांना याची माहिती व्हावी, एकत्रिकरण व्हावे, या उद्देशाने प्रयत्न सुरू आहे, यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. यातील ज्येष्ठ नागरिकांचा निसर्ग छाया उपक्रमाने दहा हजार लाभार्थ्यांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना एकत्रित करुन; मनसोक्त आनंद लुटता यावा; यासाठी आजचा सस्नेह मेळावा होत आहे. आजच्या या मेळाव्याला देखील ज्येष्ठ नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो, अशी भावना व्यक्त केली.

दरम्यान, या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर आयोजित या मेळाव्याचा ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
28.1 ° C
28.1 °
28.1 °
47 %
2.6kmh
75 %
Mon
29 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!