पंजाब नॅशनल बँक, पुणे मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पंजाब नॅशनल बँक, पुणे विभागातर्फे २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शाखा एफ.सी.रोड, पुणे येथे योग सत्रे व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या योग दिनाची थीम ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ अशी होती .
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने विविध मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) आणि इतर संस्थांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन व्यापकपणे साजरा केला. या अनुषंगाने पंजाब नॅशनल बँक, पुणे मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुणे मंडळ प्रमुख देवेंद्र सिंह व एमसीसी प्रमुख गंगाधर प्रसाद व सीबीबी शाखा प्रमुख व्ही. श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील सर्व अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
योग दिनाचे औचित्य साधून योगगुरू श्रीमती संगीता नरवणकर यांनी योगमार्गदर्शन केले. यावेळी सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.