पिंपरी-: सोहम् सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका, संत तुकारामनगर, पिंपरी यांच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात संत तुकाराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, प्रशासकीय अधिकारी हर्षद कावरे, संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, व सचिव प्रदीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात महान विचारवंतांच्या प्रतिमांना हार अर्पण करून झाली. हर्षद कावरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक समतेच्या विचारांवर भाष्य केले. नंदू कदम यांनी डॉ. आंबेडकरांचे कार्य आजही मार्गदर्शक असल्याचे अधोरेखित केले.
प्रास्ताविक जगन्नाथ नेरकर यांनी, सूत्रसंचालन महेंद्र बाविस्कर यांनी तर आभार प्रदीप बोरसे यांनी मानले. माधुरी नेरकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
