36.6 C
New Delhi
Tuesday, June 17, 2025
Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘विठ्ठल सन्मान’

मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘विठ्ठल सन्मान’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी वारी शासकीय महापूजेचे निमंत्रण

मंदिर समितीच्या शिष्टमंडळाची वर्षा निवासस्थानी भेट; महापूजेसाठी अधिकृत आमंत्रण सुपूर्त

मुंबई:– यंदाची आषाढी शुध्द एकादशी रविवार, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण महापूजेचे अधिकृत निमंत्रण मंदिर समितीकडून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वर्षा निवास, मुंबई येथे देण्यात आले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

या शिष्टमंडळात मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष औसेकर महाराज यांच्या हस्ते विठोबा विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे व चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी आषाढी यात्रेच्या नियोजन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम, तसेच जलद व सुलभ दर्शनासाठी राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती मंदिर समितीने मुख्यमंत्री महोदयांना दिली. विठोबाच्या भक्तीमय यात्रेच्या नियोजनात शासन आणि मंदिर समितीचे सुसंवाद आणि समन्वय दिसून आला.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
62 %
1.5kmh
80 %
Tue
31 °
Wed
39 °
Thu
38 °
Fri
39 °
Sat
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!