17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeदेश-विदेशआम आदमी वडगावशेरी विधानसभेची उमेदवारी प्रशांत केदारी यांना देणार - अजित फाटके

आम आदमी वडगावशेरी विधानसभेची उमेदवारी प्रशांत केदारी यांना देणार – अजित फाटके


प्रशांत केदारींसह शेकडो अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश –

पुणे – सामाजिक कार्यकर्ते प्रशांत(लुकस)केदारी यांनी दिमाखदार कार्यक्रमात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला.त्यांच्या या प्रवेशाने वडगावशेरी मतदारसंघात प्रशांत केदारी यांना आम आदमी पक्षाची उमेदवारी मिळू शकते त्यासाठी आम्ही आग्रही राहणार असल्याचे मत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अजित फटाके यांनी व्यक्त केले .वडगावशेरी मतदारसंघात आज शेकडो कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते .
प्रशांत केदारी गेल्या २० वर्षांपासून वडगावशेरी मतदार संघ व संबंध महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, पुरोगामी विचार आणी मानवता वादी मूल्ये या विचारसरणीवर समाजातील वंचित व गरजू बांधवासाठी त्यांनी अनेक आंदोलणे, मोर्चे, परिषदा आयोजित केल्या आहेत, तसेच प्रशांत केदारी हे उच्चशिक्षित असून पुणे विद्यापीठातून त्यांनी एम बी ए केलेले आहे.
वडगावशेरीत सामान्य माणसाने सामान्य माणसांना मूलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी, पूर नियंत्रण योजना, रहदारी व्यवस्थापण,सरकारी योजनाची अंमल बजावणी करण्यासाठी आपण पराकष्टा करू असे प्रशांत केदारी यांनी प्रवेशाच्या वेळी सांगितले.
फेबियाणं सॅमसन यांनी हा प्रवेश घडवून आणला ते या प्रवेशाचे शिल्पकार ठरले आहेत.
प्रशांत केदारी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. वडगाव शेरीत तुल्यबळ विधानसभा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पहिले जाईल, तसेच त्यांची प्रतिमा देखील चांगली आहे.

सदरच्या प्रवेशाला महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी अजित फाटके, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, मुकुंद किर्डात, डॉ. अभिजित मोरे, अमित म्हस्के,रिपब्लिकन नेते राहुल डंबाळे,मुस्लिम कॉन्फरेन्स चे हाजी झुबेर मेमन, ख्रिश्चन सोसायटीच्या प्रदेश महिला संघटक तेरेसा केदारी,आप शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, फुलचंद म्हस्के, प्रमोद पारधे,अविनाश भाकरे, सौ.सुनिता काळे,सौ.प्रिया जाधव,सौ. मेरी पारगे,सौ.तहसील देसाई,प्रिती निकाळजे,मनोज शेट्टी,मनोज फुलारे,शिवाजी डोलारे,मिलींद ओहोळ,माधुरी गायकवाड,संजय कोणे,सौ.शितल कांदिळकर,जितेंद सोनवणे,सौ.अनिता सॅमसन यासह पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी ,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
3.1kmh
18 %
Tue
17 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!