मुंबई- यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसव्दारे १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ०९ लाख ५३ हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २८ कोटी ९२ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.ashadhi wari
यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगनringan सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल असा विश्वास एसटी महामंडळाचे मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे.
”एसटी पास थेट तुमच्या शाळेत” योजनेला उदंड प्रतिसाद…
शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे stbus पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याची योजना १८ जुन पासुन सुरू करण्यात आली. केवळ १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले आहेत. ही संख्या मागील वर्षाच्या जुन महिन्याच्या तुलनेत सुमारे ८३ हजार ने जास्त आहे. तसेच उत्पन्न २६ कोटीं रुपयांनी वाढले आहे. विद्यार्थ्यांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला आहे. मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यंदापासून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्याची योजना सुरू केली. तसे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रत्येक आगारातील कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रवासी पास वितरण करू लागले आहेत. या योजनेला केवळ १२ दिवसांमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला असून जुलै महिन्यात देखील अशाच पद्धतीने एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरण करीत आहेत.
१५ जुन पासुन नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६% इतकी सवलत दिली आहे,म्हणजे केवळ ३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.