26.4 C
New Delhi
Wednesday, June 18, 2025
Homeदेश-विदेशनवविवाहित जोडप्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा!

नवविवाहित जोडप्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा!

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी नवीन व्यवस्था

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवदर्शनासाठी येणारे नवविवाहित जोडपे आता रांगेत तासनतास उभे राहण्यापासून मुक्त होणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर vithal mandir samitiसमितीने नवविवाहित जोडप्यांसाठी व्हीआयपी दर्शन vipdarshanदेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांना थेट दर्शन घेता येईल.

विवाहानंतर नवविवाहित जोडपे आपल्या सुखी संसाराची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा आहे. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे या परंपरेतील एक महत्त्वाचे स्थान आहे. आतापर्यंत नवविवाहित जोडप्यांना इतर भाविकांसोबतच रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत होते. मात्र, मंदिर समितीच्या नवीन निर्णयानुसार, त्यांना आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

आषाढी-कार्तिकी ashadhi wari वारीसोबतच अन्य एकदशी आणि सदासुदीला पंढरपूर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. लग्न सराईतही मंदिर गजबजून गेलेले असते. या गर्दी नियंत्रणासाठी मंदिर समितीने नवविवाहित जोडप्यांसोबतच दिव्यांगांनाही थेट दर्शनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच, स्थानिक नागरिकांसाठीही दर्शनासाठी वेगळी वेळ दिली आहे, ज्यामुळे सकाळी ६ ते ७ आणि रात्री १० ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे.

मंदिर समितीच्या या निर्णयामुळे गर्दी नियंत्रणासाठी मदत मिळणार आहे, असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे, ज्यामुळे नवविवाहित जोडप्यांना देवदर्शन घेणे सोपे आणि सुलभ होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
52 %
3.2kmh
80 %
Wed
36 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
37 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!