नवी दिल्ली- देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर मोदी सरकार आले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आदी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पीएम मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते. तर नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. गृथ आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला देश आणि जगभरातून ८००० निमंत्रित उपस्थित आहेत. ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींसह प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी संपन्न होत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन यांनीही आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
फिर एक बार मोदी सरकार
मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
28.7
°
C
28.7
°
28.7
°
78 %
4.6kmh
97 %
Mon
29
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
35
°
Fri
30
°