पुणे: – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १४ डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.हॉल तिकीट ctet.nic.in. या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. एखाद्या शहरात जास्त उमेदवार असतील तर येत्या १५ डिसेंबर रोजी देखील परीक्षा घेतली जाऊ शकते.परीक्षेचे दोन पेपर असतील आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते ५ या वेळेत घेतली जाईल. पेपर दोन हा सकाळच्या शिफ्टमध्ये आणि पेपर एक दुपारच्या शिफ्टमध्ये घेण्यात येईल.सीटीईटी परीक्षा दोन स्तरांसाठी इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशी घेतली जाईल. ज्याला दोन्ही स्तरांसाठी शिक्षक व्हायचे आहे. त्याला दोन्ही पेपरमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असणार आहे.