स्कायवॉक व दर्शनहॉलला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शासनाच्या आभाराचा ठराव पारीत,
मंदिर समितीची कार्तिकी यात्रा व आराखड्यातील कामांबाबत आढावा बैठक संपन्न,
पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (vithal mandir) व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. पुरातत्त्व विभाग व संबधित कंत्राटदारानी सदर कामास गती देऊन वेळेत व गुणवत्तापूर्ण कामे करावीत. तसेच आराखड्यातील काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने सदर कामाबाबत जिल्हाधिकारी सोलापूर व पुरातत्व विभाग यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. kartiki ekadashi
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा pandharpur wari दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहणे, वास्तुविशारद, ठेकेदार तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
या सभेत मंदिर संवर्धन व जतन कामाबाबत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच श्रींच्या दर्शनरांगेत स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकाम करणेकामी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, अजितजी पवार, उपमुख्यमंत्री, सुजाता सौनिक, मुख्य सचिव व महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. तसेच कार्तिकी एकादशी दि.12 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे. या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरा तसेच भाविकांना देण्यात येणा-या सोई सुविधांचा आढावा घेण्यात आला. परंपरेनुसार दि. 04 नोव्हेंबर रोजी श्रींचा पलंग काढून प्रक्षाळपुजेपर्यंत म्हणजे दि. 04 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 24 तास श्रींचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षीप्रमाणे पत्राशेड येथे पूर्णवेळ अन्नछत्र सुरू करणे तसेच यात्रेच्या अनुषंगाने विविध सोई सुविधांचा आढावा घेऊन भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले.
धर्मादाय आयुक्त यांनी नुकतीच अनुकंपा तत्वावरील नियमावलीस मंजुरी दिली आहे, या नियमावलीनुसार अमोल चंद्रकांत वाडेकर, अशोक विठ्ठल कोले, सुनिता अरूण माळवदकर, अभिमन्यू रंगनाथ क्षिरसागर या आस्थापनेवरील आकस्मित मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच धर्मादाय आयुक्त यांच्या मान्यतेनुसार आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यात आले. तसेच विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, वेदांता भक्तनिवास व व्हिडीओकॉन भक्तनिवासाच्या ठिकाणी सोलार प्लॉन्ट बसविणे, मंजुर 270 पदांच्या आकृतीबंधातील रिक्त पदे भरती करणेकामी बिंदुनामावली व सेवा प्रवेश नियमावली तयार करणे, एमटीडीसी भक्तनिवासाचा करार वाढवून घेणे, यमाई तुकाई मंदिर पंढरपूर येथील जागा मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करणे, नामदेव पायरी येथील दरवाज्याला दानशुर भाविकांमार्फत मोफत चांदी मढविणे, रक्षक सिक्युरिटी कंपनीच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने समिती गठीत करणे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारीत करणे इत्यादी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
याशिवाय, महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय व महान संत परंपरा आहे. या परंपरेतील साहित्य, संस्कृती, परंपरा, कला इ. ना एकत्र आणून एक हक्काचे व्यासपीठ देणारा प्रकल्प जो शासन व जनमानसाला सुध्दा उपयुक्त ठरेल. यादृष्टीने संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच पंढरपूर (श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर), आळंदी (श्री संत ज्ञानदेव), त्र्यंबकेश्वर (श्री संत निवृत्तीनाथ), सासवड (श्री संत सोपानदेव), मुक्ताईनगर (श्री संत मुक्ताबाई), पैठण (श्री संत एकनाथ) व देहू (श्री संत तुकाराम) येथे कम्युनिटी रेडिओ प्रवर्तित करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे. या सर्वांचे पालकत्व व नेतृत्व करण्यास श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती तयार आहे. संतवाणी रेडिओ व अँपद्वारे जगभरात आपणास महाराष्ट्र्रातील संतवाड़:मय पोहचविता येईल. सदरचा प्रकल्प राबविण्यासाठी सदर विषय तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट करणेकामी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना प्रस्ताव सादर येणार असल्याची माहिती यावेळी सह अध्यक्ष औसेकर यांनी दिली.