पंढरपूर – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात(Pandharpur Temple safety measures) भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत, अशी माहिती मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोबाईल आणि कॅमेरा बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व भाविकांची प्रवेशद्वारावर तपासणी केली जात असून, मोबाईल किंवा कॅमेरा सापडल्यास प्रवेश नाकारला जातो.

याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले असून, त्यांना फक्त व्हीआयपी गेटद्वारेच प्रवेश व निर्गमन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भाविकांचा प्रवास सुरक्षित व व्यवस्थित पार पडावा, यासाठी मंदिर प्रशासनाकडून अधिक दक्षता (SafePilgrimage)घेण्यात येत असून, कोणतीही शंका आल्यास त्वरित सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.