24.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमनोरंजनअनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा 'जर्नी' २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित

अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित

  सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत 'जर्नी' चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. आयुष्य, नाती आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष असणाऱ्या या 'जर्नी'मध्ये शुभम मोरे, माही बुटाला, निखिल राठोड या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असून याव्यतिरिक्त या चित्रपटात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने,  प्रशांत तपस्वी यांच्याही मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. सचिन दाभाडे यांनी कथा, निर्माते, दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत. 

आयुष्याचा किंवा पर्यटनाचा प्रवास असो प्रत्येक अनुभव काही ना काहीतरी शिकवून जातो. या प्रवासात चढउतार येत असतात तेव्हा अनेक गोष्टींचे महत्व समजते. आयुष्याच्या प्रवासाची अनुभूती देणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित असून त्यात एक लहान मुलगा आणि काळजीत असणारे दोन चेहरे दिसत आहेत. या तिघांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यांची ही ‘जर्नी’ त्यांना कोणत्या वळणावर घेऊन जाईल, हे लवकरच कळणार आहे. या चित्रपटाच्या वितरणाची धुरा बॅाक्स हिट मुव्हिजच्या अनुप जगदाळे आणि मोनालिसा बागल यांनी सांभाळली आहे.

दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे या चित्रपटाबद्दल म्हणतात, '' कुटुंब, नाती, भावना आणि स्वतःशी असलेला लढा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या प्रवासात अनेक भावना उलगडणार असून एक अनोखा प्रवास आपल्या यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. एका लहान मुलाच्या आयुष्यातील हा प्रवास आवर्जून पाहावा असा आहे.''
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
31 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!