27.2 C
New Delhi
Monday, August 11, 2025
Homeमनोरंजनकलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन

पुणे : आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रात याच मकर संक्रातीचे औचित्य साधून पहिल्यांदाच बालगंधर्व परिवार महाराष्ट्र आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन (एम.आर.बी.फाउंडेशन ) तसेच अनेक कला संस्थांच्या संयुक्त विद्यमाने .पुणे शहर आणि जिल्ह्यातील महिला आणि पुरुष कलाकारांचा भव्य दिव्य स्नेह मेळावा अतिशय उत्साहात तिळगुळ वाटप करून व हळदीकुंकू वाण वाटप करून अतिशय उत्साहात संपन्न झाला .यावेळी सुप्रसिद्ध निवेदक खेळांचा बादशहा बाळकृष्ण नेहरकर यांनी खास महिला व पुरुष कलाकारांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे विशेष सादरीकरण केले .यात सर्वच कलाकारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी विजेत्या महिला कलाकारांना खास मानाच्या पैठणी साड्या भेट देण्यात आल्या तसेच उपस्थित महिला व पुरुष कलाकारांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून विशेष बंपर बक्षिसे देण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणाऱ्या मान्यवर महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई. अलविरा मोशन एंटरटेनमेंटच्या संस्थापक, निर्मात्या दिपाली कांबळे, एम. आर .बी. फाउंडेशनच्या संचालक. हेमलता मेघराज राजेभोसले. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती हांडे ,नगरसेविका स्वाती पोकळे , अभिनेत्री. प्राजक्ता गायकवाड . अभिनेत्री सुरेखा कुडची, प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर प्रसिद्ध अभिनेत्री हेमा तुपे- जगताप .चित्रपट निर्मात्या विजयालक्ष्मी जाधव आणि बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

याप्रसंगी मेघराज राजे भोसले फाउंडेशन ,बालगंधर्व परिवार महाराष्ट्र ,अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ,पिंपरी चिंचवड कलाकार संघ ,कला परिवार हडपसर ,नृत्य परिषद महाराष्ट्र ,यांच्या माध्यमातून खास कलाकारांसाठी “आरोग्य तुमचे संरक्षण आमचे” health या धरतीवर आरोग्य विमा मेडिक्लेम पॉलिसीचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कलाकार मग तो रंगमंचावरचा असो ,पडद्यामागील असो किंवा मालिका चित्रपटात marathi cinema काम करणारा अथवा तमाशातील संगीतबारीतील लोककलावंत असो किंवा साऊंड, लाईट, नेपथ्यकार या प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी म्हणून अत्यंत अल्प दरात कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आरोग्य विमा काढून स्वतःच्या आरोग्या विषयी जागरूक आणि सतर्क राहायला हवे असे यावेळी रूपाली चाकणकर rupalitai chakankar म्हणाल्या.
कलाकारांनीच कलाकारांसाठी आयोजित केलेल्या या स्नेह मिळाव्यात येऊन खऱ्या अर्थानं आनंद वाटला .कलाकारांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी मी नेहमीच सर्व कलाकारांच्या सोबत कायम असेल असे या वेळी तृप्ती देसाई म्हणाल्या.
कलाकारांच्या अडचणी म्हणजे या माझ्या अडचणी आहेत. कलाकारांच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कलाकारांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. म्हणूनच मी मोठ्या प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कलाकारांसाठी हा आरोग्य विमा आणलेला आहे कलाकारांनी आजारपणात कुणापुढे हात पसरू नये व त्यांनी स्वाभिमानाने जगावे ही माझी प्रामाणिक भावना असल्याचे यावेळी मेघराज राजेभोसले म्हणाले.
कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेषतः महिला कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी आदरणीय मेघराज भैय्यांनी फक्त आवाज दिला तरी मी कायम कलाकारांच्या पाठीशी उभी आहे असे दिपाली कांबळे म्हणाल्या.
बालगंधर्व परिवार महाराष्ट्र आणि मेघराज राजेभोसले फाउंडेशन तसेच सर्व कला संस्थांच्या माध्यमातून या स्नेह मिळाव्याचे विशेष आयोजन करण्यात आले ,पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो महिला कलाकारांनी यात सहभाग घेतला .प्रास्ताविक मेघराज राजेभोसले यांनी केले. आभार अनिल अण्णा गुंजाळ यांनी मानले. तर पराग चौधरी, .चित्रसेन भवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला व पूरूष कलाकारांनी पुढाकार घेऊन विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.2 ° C
27.2 °
27.2 °
72 %
4.1kmh
100 %
Mon
28 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
29 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!