आज विशेष शो चे आयोजन
पुणे- : घरातल्या ज्येष्ठांना अनेकदा जुनं फर्निचर असे संबोधले जाते. नव्या घरात जुनं फर्निचर जसे आऊटडेटेड होते, मिसमॅच होते तशीच काहीशी अवस्था या ज्येष्ठांची झालेली असते. दोन पिढ्यांमधला हा दुरावाच्या वास्तवाचे चित्रण असलेला चित्रपट २६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तसेच २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. सिटी प्राईड, कोथरूड येथे विशेष शो चे आयोजन केले आहे.” अशी माहिती जुनं फर्निचर या चित्रपटाचे दिग्दर्शक व मुख्य अभिनेता महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनचे संचालक सत्यप्रभा गिरी व मेधा मांजरेकर उपस्थित होते.
आज अनेक घरांमध्ये पालकांचा व्यावहारिक उपयोग करून घेतला जातो. एनआरआय मुलं महिन्यातून एखदा तरी फोन आईवडिलांना करतात. पण एकाच शहरात राहणार्या किंवा एकाच घरात राहणार्या मुलांकडे आई वडिलांना फोन करायला किंवा भेटायला वेळ नसतो. अनेक घरांमध्ये पालकांना जुनं फर्निचर संबोधले जाते. त्यातून हा विषय सुचला असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.
आज घराघरातील प्रौढांच्या वाट्याला हताश अवस्था आलेली आहे. जुन्या फर्निचर प्रमाणे तेही अडगळ बनत आहेत. थोडी उसंत काढून या अडगळीकडे एकदा नीट पाहायला हवं. अडगळीमधला समृध्द वारसा शोधत त्याच्याशी कनेक्ट व्हायला हवं.
सत्य-सई फिल्म्स आणि स्कायलिंग एंटरटेन्मेंट प्रस्तुत जुन फर्निचर चे यतिन जाधव हे निर्माते आहेत. याची कथा, पटकथा, संवाद महेश मांजरेकर यांचे आहे. यामध्ये महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, भूषण प्रधान यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे आहे.जुनं फर्निचर चित्रपटातील ७१ वर्षाचा गोविंद श्रीधर पाठक हा म्हातारा व्यवस्थेला आव्हान देतांना म्हणतो की या म्हातार्याला अडवूनच दाखवा. आपल्या पत्नीच्या निधनाचा ठपका आपल्या मुलांवर ठेवत कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा दावा करतो. यामध्ये गोविंद पाठक अँग्री यंग मॅनच्या आवेशातही दिसतो. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा आहे. दोन पिढ्यांमधील संघर्ष आज केवळ मतभेदांपुरता, जीवनमूल्यांमधील फरकांपुरता उरलेला नाही. या चित्रपटाचा विषय केवळ आपल्या कुटुंबात नाही तर आपल्या अंतरंगातही डोकावण्याची संधी आहे. यांतील संवाद हे चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे आहेत. यामध्ये काय चुकले सांग ना हे गाणं महेश मांजरेकर यांनी आपल्या आवाजात गायले आहे.
अनेकदा वयस्कर व्यक्तींना आउटडेटेड असं म्हंटल जातं. याचा सामानाची किंमत आणि ताकद काय आहे हे सांगणारा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
मराठी संस्कृती जपणारे फाउंडेशन
लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनचे संचालक सत्यप्रभा गिरी यांनी सांगितले की, “आमचे फाउंडेशन मराठी संस्कृती जपणारी असून ज्येष्ठांचे प्रश्न व त्यांच्या समस्यांवर काम करतो. त्याच धर्तीवर हा चित्रपट असल्याने २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वा. सिटी प्राईड कोथरूड येथे विशेष शो चे आयोजन केले आहे. मराठी संस्कृती जपणारे अभिनेता महेश मांजरेकर हे आमचे जवळचे मित्र आहेत. मैत्रीखातर ते आमचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. हा त्यांचा नवा चित्रपट जो नाते संबंध आणि माणुसकीला धरून आहे. आम्ही पुर्नविकासामध्ये ओल्ड एज लोकांचे महत्वाचे प्रश्न धरूनच काम करतो. हे करतांना घराबरोबरच ज्येष्ठाची मानसिकता बदलणे म्हणजेच रिडेव्हल्पमेंट होईल.”
लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनः
लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनची स्थापना सत्यप्रभा गिरी यांनी केली आहे. समाजातील ज्येष्ठांच्या समस्या आणि विशेषकरून महिलांच्या सामाजिक आणि आरोग्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून कामगार कल्याण, कामाच्या ठिकाणी लहान मुलांसाठी पाळणाघर, महिलांन सुरक्षा प्रदान करणे व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रोत्साहन दिले जाते.