● अनन्या पांडे आणि तिच्या स्टायलिस्ट, केस आणि मेकअप आर्टिस्ट आणि फॅशन फोटोग्राफर यांच्या टीमने आयोजित केलेला हा एअरबीएनबी ओरिजिनल ४ तासांचा अनुभव चाहत्यांना अनन्याच्या स्लेबुकमधून थेट ग्लॅमरस सत्रासाठी खास पुढच्या रांगेत बसण्याची संधी देतो.

● या खास फॅशन अनुभवासाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बुकिंग सुरू होईल.
पुणे, : बॉलीवूड फॅशन आयकॉन अनन्या पांडे एक खास, अद्वितीय फॅशन आणि ग्लो अप अनुभव “अनन्याज स्टाईल एडिट”, फक्त एअरबीएनबीवर आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. फॅशनप्रेमी, ग्लॅमरचा शोध घेणाऱ्या आणि अनन्याच्या चाहत्यांना त्यांच्या सिग्नेचर स्टाइल विश्वात प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेला हा अनुभव जास्तीत जास्त चार पाहुण्यांना उपलब्ध असेल.
दिल्लीतील सर्वात आकर्षक एअरबीएनबीपैकी एक असलेल्या अनन्याच्या स्वप्नातील क्लोसेट आणि व्हॅनिटी स्पेसच्या स्वप्नातीतल आवृत्तीत राहण्याची संधी चाहत्यांना मिळेल. तिच्या वॉक-इन वॉर्डरोबपासून ते व्हॅनिटी झोनपर्यंत ही जागा पूर्णपणे धमाल फॅशन प्लेग्राउंडमध्ये रूपांतरित झाली आहे.

अनन्यासोबत तिची एक्सपर्ट ए-टीम यात सहभागी होईल. ती चाहत्यांना फायनल ग्लो-अप देईल. त्यांना तिच्या आवडत्या स्टायलिस्टकडून स्टाईल करून घेण्याची संधी मिळेल. तिच्या विश्वासू सौंदर्य टीमकडून ग्लॅमरस लुक मिळेल आणि आवडत्या फोटोग्राफरकडून फोटो काढले जातील. उत्तम ग्लो-अप, भलीमोठी फॅशन ऊर्जा आणि आपणच हिरो असल्याची भावना तुम्हाला उत्साहित करेल.
“मी एअरबीएनबी ओरिजिनल्सने तयार करून आयोजित केलेल्या “अनन्याज स्टाईल एडिट” द्वारे माझ्या ग्लिट्झ आणि ग्लॅमच्या जगात पाहुण्यांचे स्वागत करण्यास खूप उत्सुक आहे. फॅशन आणि अभिव्यक्ती हे एक अभिनेत्री म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग आहेत आणि माझ्या चाहत्यांना पर्सनल, प्रत्यक्ष पद्धतीने त्याची ओळख करून देणे ही खास गोष्ट आहे. या सुंदर अनुभवात पाहुण्यांना भेटण्यासाठी, गप्पागोष्टी करण्यासाठी आणि एकत्र अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे सूत्रसंचालक अनन्या पांडे म्हणाल्या.
“जेन झीची प्रेरणा असलेल्या अनन्या पांडेसोबत भारतात एअरबीएनबी ओरिजिनल्स आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ओरिजिनल्स ही जगातील सर्वात लोकप्रिय कलाकारांकडून आयोजित केलेली असाधारण अनुभवांची मालिका आहे आणि ती केवळ एअरबीएनबीसाठी डिझाइन केलेली आहे. अनन्याज स्टाईल एडिट हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अनन्याची स्टाइल आणि बॉलिवूडप्रेमी देशातील तरुण प्रेक्षकांशी असलेले मजबूत कनेक्शन या सहकार्याला खरोखर खास बनवते. आम्हाला चाहत्यांना तिचे ग्लॅमरस जग जवळून अनुभवण्याची संधी देताना अभिमान वाटतो. त्यातून तिच्याशी जिव्हाळ्याचे, स्नेहमीय आणि अविस्मरणीय नाते तयार होईल,” असे एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले.
अनन्याज स्टाइल एडिट अनुभवाबाबत
अनन्या पांडेने आपल्या ए-टीमसोबत तयार करून नवी दिल्लीतील एअरबीएनबीमध्ये आयोजित केलेल्या या ४ तासांच्या अनुभवात खालील गोष्टी समाविष्ट असतील:
● फॅशन रिबूट: अनन्याकडून प्रेरित लूक तयार करण्यासाठी सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट अमी पटेल यांच्यासोबत एक खास स्टायलिंग सत्र – तज्ञांच्या आऊटफिट मार्गदर्शनासह.
● स्ले अँड स्प्रे: अनन्याच्या आयकॉनिक लूकच्या निर्मात्या जोडीकडून मोहित होण्याची संधी. तिच्या हेअरस्टायलिस्ट आंचल मोरवानी यांच्याकडून सुंदर केशभूषा आणि तिच्या मेकअप आर्टिस्ट रिधिमा शर्मा यांच्याकडून स्पॉटलाइटसाठी खास मेकअप. (इशारा: तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही इतके सुंदर दिसाल).
● पोज अँड शाइन: अनन्या पांडेसोबत एका हाय-एनर्जी फॅशन शूटमध्ये सहभागी व्हा. हे शूटिंग फोटोग्राफर राहुल झांगियानी आणि त्यांच्या टीमकडून केले जाईल. ते तुमचे नवीन लूक आकर्षक, खास स्टाइल पोर्ट्रेटच्या मालिकेत शूट करतील – ते तुम्हाला इन्स्टाग्राम ग्रिडवर दिसेल.
● कॉफी विथ अनन्या: या अप्रतिम दिवसाचा समारोप करताना अनन्यासोबत स्वतः आरामदायी कॉफी चॅटचा आनंद घेता येईल. ती मनापासून सांगत असलेल्या वैयक्तिक फॅशन स्टोरीज, गो-टू ब्युटी हॅक्स आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या टिप्स ऐका.
● स्ले दि डे भेटवस्तू: प्रत्येक चाहत्याला अनन्याने निवडलेल्या खास गुडी बॅग दिली जाईल. त्यात ती स्वतः तिच्या स्टाईलसाठी आवश्यक गोष्टी आणि स्वाक्षरी केलेल्या स्मृतिचिन्ह देईल.
कसे बुक करायचे:
● बुकिंग २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल airbnb.com/ananya
● हा ४ तासांचा अनुभव फक्त शून्य रूपये किमतीत उपलब्ध आहे.
● या अनुभवात जास्तीत जास्त ४ पाहुणे सहभागी होऊ शकतात. १ किंवा २ लोकांसाठी बुक करा. परंतु जागा मर्यादित असल्यास फक्त एकाच व्यक्तीचे बुकिंग होईल. पाहुण्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या तत्वावर असेल.
● नवी दिल्ली, भारत येथे जाणे आणि येण्याचा खर्च पाहुण्यांना करावा लागेल.
कृपया लक्षात ठेवा की हा खास अनुभव स्पर्धा नाही. त्यामुळे बुकिंग करणाऱ्यांचे एअरबीएनबी प्रोफाइल सक्रिय असणे आवश्यक आहे आणि प्लॅटफॉर्मवर सकारात्मक रिव्ह्यूचा इतिहास असणे आवश्यक आहे. बुकिंग करण्याची विनंती करणाऱ्या सर्व चाहत्यांनी सरकारने जारी केलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.


