32.8 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमनोरंजनबिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत

बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत

सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!

जेजुरी- बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे त्याच्या मूळगावी जंगी स्वागत करण्यात आले. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन सूरज आपल्या मूळ गावी मुर्टी मोढवेमध्ये परतला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. सकाळपासूनच सूरजला पाहण्यासाठी त्याच्या घरी चाहत्यांची रांग लागली होती. सूरजचे गावात आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच गुलालाची उधळण करण्यात आली.

यावेळी डीजेच्या तालावर अवघी तरुणाई थिरकली. सूरजने देखील त्यांच्या सोबत ठेका धरला. यावेळी जेसीबीमधून सूरजवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मोठा हार त्याच्या गळ्यात घालण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवस सूरज त्याच्या घरी असल्याने या काळात मोठ्या प्रमाणावर त्याचे चाहते त्याला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
32.8 ° C
32.8 °
32.8 °
61 %
3.8kmh
26 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!