26 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमनोरंजनमहिला अत्याचारा विरोधात जनजागृती

महिला अत्याचारा विरोधात जनजागृती

मिस, मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट - इंडिया आयकॉन २०२४' फॅशन शो संपन्न

पिंपरी: बलात्कार करणाऱ्याला काठोरात कठोर शिक्षा करा.., गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या .., महिला सुरक्षेसाठी काटिबद्ध रहा .., असा संदेश देत महिलांवरील अत्याचारा बाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो आज संपन्न झाला.

कशीश सोशल फाउंडेशन आणि कशीश प्रोडक्शनच्या वतीने विष्णुप्रिया 7 आर्ट, Ak’s जगदंबा ज्वेलर्स यांच्या सहकार्याने  मिस,मिसेस,मिस्टर, किड्स इंडिया ईलाईट – इंडिया आयकॉन २०२४’फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो एल्प्रो मॉल सभागृह, चिंचवड येथे पार पडला. यामध्ये महिलांवर वारंवार होत असलेल्या अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच विविधतेतून एकता असा संदेश देण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहूणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ( पिंपरी – चिंचवड शाखा) अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, Ak’s जगदंबा ज्वेलर्सचे डॉ. अजयकुमार कारंडे, देव झुंबरे, गणेश गुरव,ब्रॅंड अॅबेसिडर सोना म्हात्रे, प्रश्विता बेहळे, आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांसह सिनेमा,फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पॅडमॅन योगेश पवार म्हणाले, अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की असे प्रकार घडण्या पासून थांबवणे. या फॅशन शो च्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत.आशा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला आसावा.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, आजची सामाजिक परिस्थिती बघितली तर गांभीर्याने सांगितलेली माहिती कितपत पटेल हे सांगता येत नाही, मात्र प्रबोधनात्मक किंवा मनोरंजक पद्धतीने सांगितले तर लोक स्वीकारतात असे अनेकदा दिसते. पॅडमॅन योगेश पवार यांनी फॅशन शो च्या माध्यमातून समाजातील अत्यंत ज्वलंत विषयाला हात घातला आहे, महिला अत्याचारांविरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची आज गरज आहे. पवार देशभर राबावत असलेले कार्य आदर्शवत आहे.  

महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ‘महिला सुरक्षा’ या थीमवर एक फॅशन वॉक करण्यात आला. यामध्ये मॉडेल्सनी  आणि आयोजकांनी महिला सुरक्षे  विषयी संदेश फलक घेवून रॅम्प वॉक केला. तसेच यामध्ये स्पर्धकांनी विविधतेतून एकता संदेश देत भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत त्या त्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या फॅशन शोमध्ये घडले.

अंजली रघुनाथ वाघ, अर्चना माघाडे, दीपाली मुंढरे, ह्यांनी मॉडेल्स ला शिकवायला योगेश पवार ला सहाय्य केले. संपूर्ण भारतातून  ३ वर्षे वयोगट ते ५५ वर्षे असे एकूण ७५ स्पर्धकांना ह्या कार्यक्रमामध्ये निवडण्यात आले होते.

चौकट:
विजेते – कार्तिकी बत्ते ,जोहान,डॅनियल मुजावर,शरयू पाटील ,सारा ,जरीन इराणी ,दीपाक्षी,जितेश पवार

उपविजेते- खुशी मोहिते,शिवण्या काकडे,अद्वित राजवडे,जेनिसा,भुवी डेंगळे, पोर्णिमा अंबार्गे ,जिया देवारे,प्रियांका मानकर, टीना शहा,अर्जुन झुंबरे,सुजल अग्रवाल

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
93 %
3.9kmh
100 %
Mon
31 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
33 °
Fri
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!