रॉकिंग स्टार यश केवळ आपल्या दमदार अभिनयामुळेच नव्हे, तर कुटुंबवत्सल स्वभावामुळेही चाहत्यांच्या मनात खास स्थान मिळवतो. सध्या ‘टॉक्सिक: द फेयरीटेल’ आणि ‘रामायण: पार्ट वन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही, यशने शूटिंगला ब्रेक देत कुटुंबासोबत खास क्षण घालवले.
यशची पत्नी आणि अभिनेत्री राधिका पंडितने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये यश आणि राधिकाची केमिस्ट्री आणि दोघांची बॉन्डिंग चाहत्यांच्या मनाला भावली आहे. राधिकाने या फोटोंसोबत लिहिले,

यश आणि राधिका पंडित यांनी नुकतेच कुटुंबासोबत उगादी आणि गुढीपाडवा साजरी केली. त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दोघेही पारंपरिक पोशाखात एकमेकांच्या सोबतीने दिसले. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
यश आणि राधिकाचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये झाला. त्यांना आयरा (२०१८) आणि यथर्व (२०१९) ही दोन मुलं आहेत. यशने एका मुलाखतीत राधिकाला आपली खरी ताकद आणि आधारस्तंभ म्हटले आहे. “ती फक्त माझी पत्नी नाही, तर माझी खरी मैत्रीण आहे,” असं यशने म्हटलं होतं.
सध्या यश ‘टॉक्सिक: द फेयरीटेल’ (१९ मार्च २०२६) आणि ‘रामायण: पार्ट वन’ (दिवाळी २०२७) या दोन मोठ्या चित्रपटांसाठी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये तो अभिनेता आणि निर्माता म्हणून सक्रिय आहे. यशच्या या नव्या प्रवासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे