17.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमनोरंजनलय आवडतेस तू मला

लय आवडतेस तू मला

'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा

आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची नांदी सुरू आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रेमकथांनी नेहमीच एक खास स्थान मिळवलं आहे. अनेक अविस्मरणीय प्रेमकथांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलंय. ‘कलर्स मराठी’वरदेखील आजवर अनेक कमाल प्रेमकथा दाखवण्यात आल्या आहेत. पण आता महाराष्ट्राच्या मातीतली अशी एक प्रेमकथा येतेय, जी ना कधी पाहिली, ना कधी ऐकली. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर कोरली जाणारी, काळजाला भिडणारी अशी ही प्रेमकथा फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

अस्सल गावच्या मातीतली एक नवी कोरी अनोखी प्रेमकथा ‘#लय आवडतेस तू मला’चा जबरी प्रोमो समोर आला आहे. कळशी आणि साखरगाव या दोन जन्मोजन्मीचं वैर असलेल्या, एकमेकांच्या गावची वेस न ओलांडणाऱ्या दुष्मन गावांमधील एक रांगडी, झन्नाट प्रेमकथा प्रेक्षकांना ‘#लई आवडतेस तू मला’ या मालिकेत पाहायला मिळेल. कळशी गावचा झुंजार गडी अर्थात सरकार साखरगावात आला अन् पाहताक्षणी साखरगावच्या साहेबवारांची लेक सानिकाच्या प्रेमात पडला. द्वेषात फुलणाऱ्या या रांगड्या प्रेमकथेची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. सरकार आणि सानिकाच्या या गावराण प्रेमकथेचा ठसका पाहायला अवघा महाराष्ट्र आतुर आहे.

‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेच्या माध्यमातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मालिकेबद्दल बोलताना सानिका मोजर म्हणाली,”‘#लय आवडतेस तू मला’च्या माध्यमातून मला पहिला ब्रेक दिल्याबद्दल ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे आभार. मालिकेची गंमत म्हणजे मी साकारत असलेल्या पात्राचं नाव आणि माझं नाव सानिकाच आहे. खूपच निरागस, भावूक, जिद्दी, प्रेमळ अशा विविध छटा असलेली सानिकाची भूमिका आहे. संघर्षातून फुलणारं प्रेम पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे”.

तन्मय जक्का मालिकेबद्दल म्हणाला,”सरकार या पात्राबद्दल मला विचारलं गेलं तेव्हा या नावातच काहीतरी वेगळं असल्याचं मला जाणवलं. या पात्राला एक वेगळी शेड आहे. हे हटके पात्र साकारताना मला मजा येत आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं असं या मालिकेचं कथानक आहे. अॅक्शन, रोमान्स, विनोद, ड्रामा अशा प्रत्येक जॉनरला टच करण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे”.

‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिका तरुणांना आकर्षित करण्यासह प्रत्येक वयोगटातील मंडळींना आपलंसं करणारी आहे. या अनोख्या प्रेमकथेच्या माध्यमातून ‘कलर्स मराठी’वर प्रेमाची नवी परिभाषा उलगडणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
42 %
5.1kmh
0 %
Wed
18 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!