9.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमनोरंजनवृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार 'झाड' चित्रपटातून !!

वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटातून !!

"झाड" चित्रपटाचा ट्रेलर लाँच!!

  • पुणे- झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असतानाच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील या चित्रपटाचा ट्रेलर बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यातील माउली थिएटर येथे लाँच करण्यात आला. याप्रसंगी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, पीएस आय राजेश पाटील, दिलीप गीते, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होते. १००० वृक्षांची लागवडही याप्रसंगी उपस्थित मंडळींच्या हस्ते करण्यात आली
  • २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नव्या दमाचे कलाकार, संपूर्णपणे वेगळा विषय हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या झाड या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे सहदिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास मोरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबस, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आयन हजारे अशी स्टारकास्ट आहे.

विकास आणि निसर्ग हे आजच्या काळातील दोन कळीचे मुद्दे आहेत. मात्र विकास साध्य करण्यासाठी निसर्गाची हानी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच वन्यजीव आणि मानव असा संघर्ष निर्माण होत आहे. तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. अशा काळात झाडे लावणे, झाडे जपण्याची गोष्ट झाड हा चित्रपट उलगडतो. एका गावात झाडे तोडणारे आणि झाडे वाचवणारे यांच्यातील संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसते. त्यामुळे झाडांचं जतन-संगोपन आणि पर्यावरण संवर्धन हा विषय चित्रपटातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न झाड हा चित्रपट करतो. चित्रपटाच्या टीजरनंतर आता ट्रेलर समोल आला आहे. त्यातून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
9.1 ° C
9.1 °
9.1 °
81 %
1kmh
1 %
Tue
12 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!