10.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमनोरंजनशातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे पदार्पण

शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे पदार्पण

९ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट होणार प्रदर्शित

 मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिला प्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिला प्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे.  आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’  या सस्पेन्स थ्रीलर  चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. 

‘शातिर THE BEGINNING’ असे या  चित्रपटाची कथा- सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे. तर पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले असून त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली  रेश्मा वायकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले असून गीतकर वैभव देशमुख यांच्या गीतांना वैशाली सामंत, शाल्मली खोलगडे यांचा स्वरसाज आहे.

पदार्पणातील भूमिकेबद्दल बोलताना रेश्मा वायकर म्हणाल्या, पहिला चित्रपट करताना काहीतरी हटके भूमिका असायला पाहिजे हे मी ठरवले होते. आज आपल्या समाजात अंमलीपदार्थ सहजतेने मिळत आहेत, ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते. या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे. अॅक्शन पॅक्ड अशा नायिका,  एक सामाजिक संदेश देणारी व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. 

या चित्रपटात रेश्मा वायकर यांच्यासह मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, श्रेया कुलकर्णी,
गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी ‘शातिर THE BEGINNING’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
10.1 ° C
10.1 °
10.1 °
87 %
1kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!