30.3 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeमनोरंजन''सारा त्रास क्षणात नाहीसा झाला”: जूनियर एनटीआर यांनी दिली 'नातु नातु'च्या ऑस्कर...

”सारा त्रास क्षणात नाहीसा झाला”: जूनियर एनटीआर यांनी दिली ‘नातु नातु’च्या ऑस्कर विजयावर भावनिक प्रतिक्रिया

भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक असलेले ज्युनियर एनटीआर आपल्या जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये त्यांनी दिलेल्या जोरदार परफॉर्मन्सने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.

या चित्रपटातील ‘नातु नातु’ हे गाणं, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी एकत्र परफॉर्म केलं, हे एक जागतिक स्तरावरील सांस्कृतिक प्रभाव बनलं. हे गाणं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय म्युझिक चार्ट्सवर टॉपवर राहिलं आणि ९५व्या अकादमी पुरस्कारांमध्ये (ऑस्कर)‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणं’ म्हणून गौरवण्यात आलं.

अलीकडेच ज्युनियर एनटीआर यांनी दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि सहकलाकार राम चरण यांच्यासोबत रॉयल अल्बर्ट हॉल येथे झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये भाग घेतला. या वेळी त्यांनी ऑस्कर जिंकल्याचा अनुभव शेअर करताना आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

ज्युनियर एनटीआर त्यावेळी म्हणाले, “जेव्हा आम्ही ऑस्कर जिंकलो, तेव्हा मला वाटलं, की आमच्या दिग्दर्शकांनी दिलेलं सगळं त्रासदायक ट्रेनिंग, सगळा घाम, सगळा शारीरिक आणि मानसिक संघर्ष एकाच क्षणात नाहीसा झाला.” तसेच, राम चरणसोबत नातु नातु सादर करण्याचा अनुभव सांगताना त्यांनी म्हटलं, ” ‘नातु नातु’ हे गाणं केवळ ऑस्करसाठी खास नव्हतं, तर ते आम्ही दोघांनी एकमेकांचा सन्मान करणारे कलाकार आणि मित्र म्हणून एकत्र साकारलेला अनुभव आहे. माझ्यासाठी ते गाणं कायमस्वरूपी खास राहील.”

आर.आर.आर मधील त्यांचा परफॉर्मन्स केवळ अ‍ॅक्शनपुरता मर्यादित नव्हता, तर त्यांनी अत्यंत भावनिक आणि प्रामाणिक अभिनयातून पात्राला सजीव केलं. त्यांच्या मजबूत स्क्रीन प्रेझेन्स आणि डान्सिंग स्किल्समुळे चित्रपटाचा प्रभाव अनेक पटींनी वाढला. या यशामागे अशा कलाकारांचं अपार मेहनतीचं योगदान आहे, ज्यांनी भूमिकांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं.

आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचं झालं, तर ज्युनियर एनटीआर सध्या दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या ‘एनटीआरनील’ या आगामी बिग-बजेट चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. हा चित्रपट सुद्धा मोठ्या पडद्यावर एक शक्तिशाली आणि अविस्मरणीय अनुभव देईल, असा विश्वास चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.3 ° C
30.3 °
30.3 °
70 %
3.6kmh
94 %
Fri
38 °
Sat
42 °
Sun
37 °
Mon
36 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!