14.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमनोरंजन‘होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा’ची घोषणा

‘होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा’ची घोषणा

सन मराठीचा नवीन टॉक शो - सोनाली कुलकर्णी असणार अँकर

सन मराठी त्यांच्या नवीन टॉक शो ‘होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा’ची घोषणा करताना अत्यंत आनंदित आहे. या शोचे अँकरपद प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांभाळणार आहेत. शोमध्ये मनोरंजन, गॉसिप, आणि हृदयस्पर्शी संभाषणांची मेजवानी असेल, ज्यात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सेलिब्रिटी आणि प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे सहभागी होतील.

या शोमध्ये क्रांती रेडकर, समीर वानखेडे, अजिंक्य देव, अश्विनी भावे, यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांसह, अमृता फडणवीस, किरीट सोमैया यांसारख्या प्रभावशाली राजकीय पाहुण्यांचा समावेश असेल. सेलिब्रिटी त्यांच्या बालपणातल्या आठवणी,भविष्यकालीन इच्छांबद्दल आणि काही गुपित अँकर सोनाली कुलकर्णीला सांगणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या तारकांच्या जीवनातील नवीन पैलूंची ओळख होईल.

सोनाली कुलकर्णी यांनी या शोचे अँकरपद स्वीकारल्याबद्दल आपल्या उत्सुकतेचा आनंद व्यक्त केला, “मी ‘होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा’चा भाग होण्यास खूप उत्सुक आहे. मी आधी काही शोजचे परीक्षक म्हणून काम केले आहे, परंतु हे माझे पहिलेच अँकरपद आहे, आणि मी खरोखरच याबद्दल उत्साही आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचा आयुष्याचा प्रवास मला कळला त्यांच्या आयुष्यातून खूप प्रेरणा मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाची भावनिक बाजू पाहायला मिळाली, त्यांच्याकडून बरच काही शिकता आलं. प्रेक्षकांना सुद्धा हाच अनुभव येणार याची मला खात्री आहे.”

शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, वैवाहिक जीवन, आणि आताचे जीवन या विविध टप्प्यांवर आधारित खंडांद्वारे, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या तारकांच्या जीवनाचे विविध पैलू पाहायला मिळतील.

हा कार्यक्रम तुमच्या आवडत्या सेलेब्रिटीच्या व्यक्तिमत्वाचे कधीहि न पाहिलेले पैलू उलगडणार आहे. मसालेदार आणि चवदार संभाषणांनी भरलेला हा कार्यक्रम नक्की पाहा ४ ऑगस्टपासून दर रविवारी रात्री ९ वाजता सन मराठी वाहिनीवर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
54 %
2.6kmh
0 %
Wed
16 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!