पुणे,- भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्य स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थीनी शरीन काळे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच तिला ‘आऊटस्टँडिंग परफॉर्मर ऑफ द सेशन’ चा सन्मानही मिळाला आहे. तसेच नववीच्या मृदुला जोडे हिने ही याच स्पर्धेत कनिष्ठ गटात दुसरे स्थान पटकविले.
अभिनव कला अकादमी व सांस्कृतिक मंत्रालयाच्या पाठिंब्याने आयोजित केलेल्या प्रतिष्ठितअखिल भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धे अंतर्गत अंतरंग उत्सव स्पर्धेत तिने भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्यात राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे.
तिच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी, प्राचार्य संगीता राऊतजी आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनदंन केले. यावेळी यशवर्धन मालपाणी म्हणाले की, या दोघींच्या अदभुत कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्य व यशासाठी शुभेच्छा.
नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी शरीन काळे ने शुभश्री राउतराय यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ओडिशा नृत्य सादर केले. तिने भारतीय शास्त्रीय ओडिशा नृत्य अंतर्गत सोलो डान्स-ज्युनिअर एज ग्रपमध्ये भाग घेतला. यामध्ये तिने ओडिशा नृत्यातील अभिनयाचे बारकावे आणि भाव उत्कृष्ट पद्धतीचे सादरीकरण केले. तिच्या नृत्यात तिने सिर भेद, आंख भेद, गर्दन भेद, सीना भेद या सारख्या एकत्रित आणि असंघटित हस्तमुद्रा सादर केले.
