आमिर खान प्रॉडक्शन्स सादर करत आहे वर्षातील सर्वात हृदयस्पर्शी कुटुंबप्रधान चित्रपट सितारे ज़मीन पर, जो २० जून २०२५ रोजी केवळ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
२००७ साली आलेल्या सुपरहिट तारे ज़मीन पर या चित्रपटाचा “आध्यात्मिक उत्तरार्ध” मानल्या जाणाऱ्या सितारे ज़मीन परचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून १० उदयोन्मुख कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जात आहे.

आता या कलाकारांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषभ जैन, जो चित्रपटात ‘रजु’ ही भूमिका साकारत आहे. ऋषभने बालपणापासून मिस्टर बीनसारखा कलाकार होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. निर्माता-मंडळींनी नुकतंच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत रजुची ओळख करून दिली. या व्हिडिओमध्ये ऋषभ म्हणतो, “रजु म्हणजे अर्थातच या चित्रपटाचा हिरो आहे, कारण तो आमिर सरांसोबत स्क्रीन शेअर करतो.”
ऋषभची आई सुद्धा गंमतीशीरपणे सांगते, “जेव्हा त्याची दाढी असते तेव्हा तो ‘रजु’ असतो आणि जेव्हा नसते तेव्हा पुन्हा ऋषभ होतो!”
स्वतः ऋषभने त्याच्या सहकलाकारांविषयी बोलताना सांगितलं, “टीम सितारे म्हणजेच सर्वोत्कृष्ट टीम!”
चित्रपटाच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा ओळख व्हिडिओ शेअर करत एक मजेदार कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. “रजुला भेटून तुमचंही मन आनंदानं बहरून जाईल. तर पाहा #सितारेज़मीनपर २० जूनपासून केवळ चित्रपटगृहात! ट्रेलर आऊट आता!”
चित्रपटात झळकणारे इतर नवोदित कलाकार म्हणजे अरुष दत्ता, गोपीकृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर.
चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आर. एस. प्रसन्ना यांनी, जे ‘शुभ मंगल सावधान’ या सामाजिक संदेश देणाऱ्या यशस्वी चित्रपटासाठी ओळखले जातात. आता ते आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतले आहेत.
‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गाण्यांना शब्द दिले आहेत चित्रपटाचं पटकथा लेखन दिव्य निधी शर्मा यांनी केलं असून याचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका.