19.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमनोरंजनगावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर

गावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर

'पायवाटाची सावली' २३ मे ला होणार प्रदर्शित

लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते हे उपस्थित होते. हा चित्रपट २३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू ‘मीना शमीम फिल्म्स’ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक – लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो. तेथील लोक पाण्याविणा आपला उदरनिर्वाह कसा करतात. त्यांची पाण्याप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे. आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्की आवडेल अशी मी आशा करतो. तसेच काहींना अस वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडल आहे. काहीना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती होईल. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी नक्की पहावा अशी मी आशा करतो.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
19.1 ° C
19.1 °
19.1 °
55 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!