श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखीची परंपरा पूर्वापर चालत आलेली आहे. आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा कोरोना काळातही अखंडितपणे जपलेला जगातील एकमेव ऐतिहासिक सोहळा आहे. श्रीशिवजन्मभूमी श्रीशिवनेरी ते शक्तीपंढरी दुर्गदुर्गेश्वर श्रीरायगड ते भक्तीपंढरी भूवैकुंठ श्रीपंढरपूर ते श्रीपावनखिंड ते श्रीशिवाई मंदिर श्रीशिवनेरी धारकरी – वारकरी पायी पालखी सोहळा श्रीराजाभिषेक शक 352 चे आगमन श्री महिंद गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि 18/07/2025 रोजी सकाळी 11 वाजता नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे – पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय श्री मोरया गोसावी समाधी मंदिर रोड येथे उत्साहात पालखीचे स्वागत झाले. या प्रसंगी नगरसेवक श्री सुरेश भोईर, चिंचवड काळेवाडी मंडलाध्यक्ष श्री हर्षल नढे, प्रदेश सचिव युवा मोर्चा अजित कुलथे, वि.हि.प जिल्हा मंत्री पिंपरी – चिंचवड श्री धनंजय गावडे , श्री रवींद्र प्रभुणे, श्री प्रदीप सायकर, श्री केशव नेर्लेकर, सौ दिपाली कलापुरे, सौ अंतरा देशपांडे, सुनीता शहाणे, भाग्यश्री देशमुख, भाग्यश्री पास्ते, चाचरताई, पाटीलताई सानेताई व चिंचवडगावातील शिव-शंभूभक्त बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
