स्टार प्रवाहच्या (STAR PRAVAH) लपंडाव मालिकेत सुरु झालीय सखी-कान्हाच्या लग्नाची धामधूम. लग्नाची तयारी तर जल्लोषात सुरु आहे. पण त्याआधी सखी-कान्हाने एक हटके प्री-वेडिंग फोटोशूट केलं.

भव्यदिव्य सिनेसिटी स्टुडिओमध्ये हे फोटोशूट पार पडलं. मालिका विश्वात पहिल्यांदा अश्या प्रकारे प्री वेडिंग फोटोशूट करण्यात आलंय. पारपंरिक आणि मॉडर्न अश्या दोन्ही लूकमध्ये सखी-कान्हाने फोटोशूट केलंय.

सखी -कान्हा म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देवचं खऱ्या आयुष्यात प्री वेडिंग फोटो शूट झालं नाहीय त्यामुळे दोघांसाठी हा नवा अनुभव होता.

तीन वेगवेगळे लूक आम्ही केलेत. सिनेसिटी स्टुडिओमध्ये जगभरातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. भन्नाट दिवस होता. नेहमीच्या शूटिंगपेक्षा काहीतरी वेगळं करताना खूप धमाल आली अशी भावना कृतिका आणि चेतनने व्यक्त केली.


