Cannes 2025 | आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करताना अभिनेत्री अनुष्का सेनने(AnushkaSen) पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमर, आत्मविश्वास आणि सोज्वळतेने सर्वांची मने जिंकली आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये रेड कार्पेटवर तिचा दुसरा लूक नुकताच समोर आला असून, त्यात तिच्या सौंदर्याचं आणि एलिगन्सचं परिपूर्ण मिलन पाहायला मिळालं.
२२ वर्षीय अनुष्काने परिधान केलेल्या काळ्या नेटच्या शीर ब्लाउजवर एंटिक ब्रॉन्झ वर्क आणि नाजूक हँड एम्ब्रॉयडरीचा खास स्पर्श होता. ढिली स्लीव्ह्ज आणि आकर्षक बॉडिस तिच्या पोशाखात शाही अंदाज आणत होते. यासोबतचा चंदेरी भरजरी स्कर्ट हा पारंपरिकतेचा भारदस्त भास देणारा होता. हाच आधुनिकता आणि भारतीयतेचा अद्वितीय संगम अनुष्काच्या लूकमध्ये दिसून आला.

अनुष्का सेन (AnushkaAtCannes)केवळ फॅशन आयकॉन नसून, एक प्रेरणादायी अभिनेत्री म्हणूनही नावारूपाला आली आहे. ‘दिल दोस्ती डिलेमा’ आणि ‘किल दिल’ या तिच्या ओटीटीवरील मालिकांमधील दमदार अभिनयामुळे तिच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तिच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत आहे.
कान्समध्ये तिच्या उपस्थितीमुळे आणि लूकमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली असून, तिचा हा ग्लोबल स्टाईल स्टेटमेंट जगभरातल्या युवा कलाकारांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

अनुष्काच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये साऊथ कोरियन चित्रपट ‘एशिया’ आणि इंटरनॅशनल प्रोजेक्ट ‘क्रश’ यांचा समावेश आहे. या प्रोजेक्ट्समध्ये ती कोरियन ऑलिंपिक पिस्टल शूटिंग स्टार किम ये-जी सोबत झळकणार आहे.
अनुष्का सेनने आपल्या वयाच्या २२व्या वर्षीच ग्लोबल लेव्हलवर पोहोचत संपूर्ण भारतीय तरुणाईसाठी एक नवा आदर्श उभा केला आहे. सौंदर्य, अभिनय आणि आत्मविश्वास यांच्या त्रिवेणीने सजलेली अनुष्काची ही झळाळती वाटचाल खरोखरच स्तुत्य आहे!