पुणे- समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करून स्तुती केली. मोगल अत्याचारी औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या अबू आझमीचे वक्तव्य अत्यंत निदनीय आणि संतापजनक असून महाराष्ट्रभर त्यांचा निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अबू आझमी विरोधात स्वारगेट येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की, : औरंगजेबाने महाराष्ट्रावर अमानुष अत्याचार केले, हिंदूंवर जुलूम केले आणि धर्मांतराच्या जोरावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. अशा क्रुरकर्म्याची स्तुती करणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा अपमान आहे. अबू आझमी ही महाराष्ट्राच्या राजकारणातली ती घाण आहे. महाराष्ट्राच्या या भूमीत राष्ट्रपुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असे भानगिरे म्हणाले. तसेच औरंग्याच उदात्तीकरण करणाऱ्यांचा यापुढे चौरंग केला जाईल आणि अशा अवलादी जागेवरच ठेचून काढल्या जातील असा इशारा शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिला. तसेच अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्या आमदारकीचा राजीनामा घेण्याची देखील शिवसैनिकांनी मागणी केली.
शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, उपजिल्हा प्रमुख अमर घुले, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझिरे, उपशहर संतोष राजपूत, प्रमोद प्रभुणे,दत्ता खवळे, विकी माने, नितीन लगस, निलेश जगताप, दीपक कुलाळ, तुषार मरळ, उमेश पांढरे, नरेंद्र आवारे, अनिल गडकरी, मार्तंड धुंदुके, प्रशांत डाबी,विशाल मिरेकर, कुणाल वाघ, दीपक मरळ, राजश्री माने, शितल गाडे, प्रज्ञा आबनावे, आशुतोष शेंडगे, महेंद्र जोशी, संदीप शिंदे, नवनाथ निवंगुणे,सुनील मुंजी, अनिल हवळे, अनिकेत सपकाळ , तुषार मरळ, अक्षय आवटे श्रीधर राऊत, संजय मेहता, स्मिता साबळे, शितल भंडारी, सुहास कांबळे,संजय तुरेकर, विशाल सरोदे,महेश लोयरे,पद्मा शेळके, विश्वास पोळ याप्रसंगी पुणे शहर शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.