24.4 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमहाराष्ट्र‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’

‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’

मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन : पालखी सोहळा प्रस्थानापासून आरोग्य यंत्रणा कार्यरत

      पंढरपूर,  : आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ह्या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत प्रत्येक भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ह्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहेत. तसेव पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
          आषाढी यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे,आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य शिक्षणचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सां.बां. कार्यकारी अभियंता अमित निंबकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व वैद्यकीय अधिक्षक महेश सुडके यासह राज्यातील ऑनलाईन द्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते.


          सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे वाखरी व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.तसेच गोपाळपूर व 65 एकर येथे 50 खाटांचे तात्पुरते सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, भाविकांची आरोग्य तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा, पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे . पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था , व्यक्ती यांच्याकडून दिंड्यातील वारकरी भाविकांना अन्नदान व फळ वाटप केले जाते. वाटपकरण्यात अन्नाची व फळांची तपासणी  करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.


         पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या दिंड्यांच्या प्रत्येक मार्गावर आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटल 24 तास सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. वारी कालावधीत  महावितरण विभागाने ज्यादा रोहित्रांची सुविधा व मुबलक मनुष्यबळाची व्यवस्था ठेवावी. शहरातील वीज वाहक तारा झाडाझुडपांच्या फांद्यात अडकल्या असतील तर फांद्या तात्काळ काढून घ्याव्यात. नदीपात्रात नळ कनेक्शनची संख्या वाढवावी.स्वच्छतेसाठी ज्यादाचे कर्मचाऱ्यांची उपलब्धता ठेवावी  वाळवंटात कचरा साठवण्यासाठी पत्र्याच्या पानांचे 100 ते 200 मीटरला तात्पुरते कचरा कुंड्या कराव्यात जेणेकरून मोठ्या प्रमाणात कचरा साठवता येईल. वाळवंटात बाईक ॲम्बुलन्स ची उपलब्धता ठेवावी जेणेकरून भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होतील . पोलीस प्रशासनाने वारी कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी . नगरपालिका विभागाने आरोग्य शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता व पाण्याचा पुरवठा, अग्निशमन व्यवस्था उपलब्ध ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने शिबिराच्या ठिकाणी मुरमीकरण करावे पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रशासनातील सर्वच विभागाने समन्वयने काम करावे अशा सूचनाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्या.

           यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी  महाआरोग्य शिबीरासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादरी करणाव्दारे दिली. तसेच मागील आषाढी यात्रेत महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून 11 लाख 64 हजार वारकरी भाविकांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
24.4 ° C
24.4 °
24.4 °
46 %
1.8kmh
0 %
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!