पुणे – एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे आवारात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालय आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी लोणावळा येथील कैवल्यधाम केंद्राच्या योगशिक्षिका रेणुका श्रीवास्तव आणि त्यांच्या स्वयंसेविकांनी योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी उपस्थितांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एकाग्रता साधण्यासाठी आणि ‘स्व’ची ओळख होण्यासाठी योग हा जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा, असे मत प्राचार्यांनी मांडले. क्रीडा विभागाच्या प्राध्यापिका अनुराधा ठोंबरे आणि प्रा. राधिका राऊत यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमात एसएनडीटी परिवारातील विद्यार्थिनीसह पुणे आवारातील प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
एसएनडीटीत योग दिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES
New Delhi
mist
13.1
°
C
13.1
°
13.1
°
76 %
0kmh
0 %
Wed
19
°
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°


