- पुणे : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 18 ऑक्टोबर 2024 रोजी बोट क्लब (रॉयल कॅनॉट), पुणे येथे सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 यावेळेत ‘ग्लोबल एड्युकेशन फेअर’ भरवण्यात येणार आहे. येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे, अशी माहिती ‘स्टडी स्मार्ट’ चे मॅनेजिंग डायरेक्टर चेतन जैन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चेतन जैन म्हणाले, 12 वी नंतर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची इच्छा असते. पण त्यासाठी परदेशातील कोणत्या विद्यापीठात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आणि कशी असते? परदेशात जायचं म्हटलं की तेथील राहण्याची सोय कशी होणार ? यासाठी लागणारा पैसा कसा उपलब्ध होईल? असे अनेक प्रश्न पडतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने आयोजित ‘ग्लोबल एड्युकेशन फेअर’ मध्ये एकाच छताखाली मिळणार आहेत. यामध्ये यूके, यूएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई येथील 50 हून अधिक टॉप विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता येणार आहे. तसेच येथील अभ्यासक्रम व करीयरच्या संधी जाणून घेता येणार आहेत.
या ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर’मध्ये परदेशात शिक्षणासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत; येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील (Sep 25) प्रवेशाच्या संधी, वैयक्तिक मार्गदर्शन, स्पॉट ऑफर आणि IELTS सूट, अभ्यासोत्तर काम आणि करिअरच्या संधी याबाबत येथे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच या सर्वांसाठी आवश्यक असणारे अर्थसाहाय्य कशा प्रकारे उपलब्ध होईल? याविषयी विनामूल्य मार्गदर्शन देखील केले जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी www.studysmart.co.in वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन जैन यांनी केले.