19.1 C
New Delhi
Friday, November 28, 2025
Homeमहाराष्ट्रचंपाषष्ठी:धामणीला स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने दुग्धाभिषेक

चंपाषष्ठी:धामणीला स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने दुग्धाभिषेक

धामणी – येथील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान.व शौर्य व भक्तिचे प्रतिक असलेल्या जागृत देवस्थान श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात गाभार्‍यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेल्या खंडेरायाचे दर्शनासाठी व पांच नामाचे जागरण देवकार्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली होती.यामध्ये महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय होता.शेकडो भाविकांनी पांच नामाची जागरणे घातली.पुणे.नगर,नाशिक मुंबई जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे चंपाषष्ठीला भल्या पहाटे चार वाजता खंडोबाच्या मूर्तीसमोरील स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने दुग्धाभिषेक चंपाषष्ठी भंडारा उत्सव मंडळाचे मच्छिंद्र वाघ.सुभाष काचोळे.किसन रोडे.प्रकाशनाना जाधव.उत्तम जाधव.संतोष जाधव या सहा जोडप्याच्या आणि देवाचे परंपरागत मानकरी.सेवेकरी मंडळी यांच्याकडून करण्यात आला.

त्यानंतर सप्तशिवलिंगाववर पंचधातूच्या आकर्षक खंडेराय.म्हाळसा.बाणाईच्या सर्वांगसुंदर लोभस मुखवट्याची प्रतिष्ठापना सेवेकरी मंडळीनी केली.त्यानंतर या पंचधातूच्या मुखवट्याला व पूर्वमुखी खंडोबा.म्हाळसाई.बाणाई.व उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहिध जोगेश्वरी यांच्या विलोभनीय मूर्तीना वस्रालंकार चढविण्यात आले.पहाटेच्या सुमारास सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.नामदेव भगत.राजेश भगत.बाळशिराम साळगट.माऊली वाघे.सिताराम वाघे.दिनेश जाधव. सुरेश पवार.नामदेव वीर या भगत.तांबे वाघे वीर या सेवेकरी मंडळीनी विधिवत पारंपारिक पूजा केली व महाआरती करण्यात आली.सेवेकरी व मानकरी मंडळीनी गाभार्‍यात सप्तशिवलिंगावर” सदानंदाचा येळकोट”चा जयघोष करुन भंडारा उधळला.त्यानंतर भगत मंडळीनी पुरणपोळी.शेवयाची खिर.सारभात.कुरडई असा पंचपक्वानाचा आणि वांग्याचे भरीत रोडग्याचा व लापशीचा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आला.त्यानंतर भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले.यावेळी दर्शनासाठी व तळीभंडार करण्यासाठी पंचक्रोशीतील मंडळीसह गावडेवाडी.महाळुंगे पडवळ.गुंजाळवाडी.बेल्हे.तळेगांव ढमढेरे.मरकळ.वाघाळे.पाबळ. अवसरी खुर्द.संविदणे.कवठे येथील मानाच्या काठीचे मानकरी व भाविक उपस्थित होते.देवाचे दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या.पांच नामाचे जागरणासाठी भाविकांनी सहकुटुंब गर्दी केलेली दिसत होती.मंदिराच्या सभामंडपात सकाळी नऊ वाजता भक्ति वेदान्त वारकरी शिक्षण संस्था खंडाळे (शिरुर) चे संस्थापक ह.भ.प. संतोष महाराज खेडकर यांचे काल्याचे सुश्राव्य किर्तन झाले.किर्तन सोहळ्याला.खडकवाडी.लोणी. जारकरवाडी.पहाडदरा.शिरदाळे. येथील भजनी मंडळीनी पखवाज.विणा.टाळ मृदुंगाची साथ दिली किर्तनाची व्यवस्था अविनाशमहाराज बढेकर.व सुभाष तांबे यांनी पाहीली.किर्तन संंपल्यानंतर भाविकांच्या पांच नामाच्या जागरणाला वाघे वीर मंडळीनी सुरुवात केली.जागरण देवकार्य करण्यासाठी धामणी.शिरदाळे.पहाडदरा.जारकरवाडी.खडकवाडी रानमळा.लोणी येथील महिला भाविकांची गर्दी लक्षणीय होती.मंदिराबाहेर भंडारा खोबरे नारळ.फुलाचे हार बेल विक्रीची दुकाने थाटलेली होती.भाविकांची चारचाकी व दुचाकी वाहनानी मोठी गर्दी केलेली दिसत होती.भर उन्हात देवाचे दर्शनासाठी पायी येणार्‍या भक्तांची संख्या मोठी दिसत होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
19.1 ° C
19.1 °
19.1 °
55 %
2.1kmh
40 %
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
24 °
Tue
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!