पिंपरी -‘आमच्या च-होलीला महापौरपद देऊन शहराचे नेतृत्व करण्याची संधी देणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे’’, अशी ग्वाही च-होलीकरांनी दिली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या समाविष्ट गावातील च-होलीतील आपुलकीच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी आमदार लांडगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
‘भोसरी माझी आई, तर च-होली माझी मावशी’ असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले आहे. भोसरीप्रमाणेच आपले च-होलीकरवर प्रेम आहे. त्यामुळेच च-होलीच्या विकासासाठी मी कधी कमी पडणार नसल्याची ग्वाही आमदार लांडगे यांनी दिली. च-होलीतील आपुलकीच्या गाठीभेटींना ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी रांगोळ्या काढून स्वागत केले. चऱ्होली फाटा येथून सकाळी साडेनऊ वाजता आपुलकीच्या गाठीभेटींना सुरुवात झाली. पठारे मळा, कोतवालवाडी, साठेनगर, चऱ्होली गावठाण, बुर्डे वस्ती, दाभाडे वस्ती, आझाद नगर, चोवीसावाडी, वडमुखवाडी, दत्तनगर (काळी भिंत), चऱ्होली फाटा, आनंद तरंग सोसायटी, वाघेश्वर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. काटे वस्ती येथे कोपरा सभा पार पडली. या प्रचार फेरीत माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, सचिन तापकीर, विकास बुर्डे, बाळासाहेब मोळक, अजित बुर्डे, सुनील तापकीर, भाऊशेठ रासकर, शहाजी तापकीर, संतोष पठारे, श्रीकांत तापकीर, नंदकुमार दाभाडे व च-होली ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चऱ्होलीचा कायापालट झाला…
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी नितीन काळजे यांच्या रूपाने चऱ्होलीला महापौरपद दिले. शहराचे नेतृत्व समाविष्ट गावाकडे आले. भाजपची सत्ता आल्यानंतर चऱ्होलीच्या विकासाला गती मिळाली. अंतर्गत रस्ते, पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या. सुविधा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था उभारल्या. परिसराचा कायापालट झाला आहे. 2017 नंतर चऱ्होली पिंपरी-चिंचवड शहरात आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे आमच्या चऱ्होलीचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या आणि शहराचे नेतृत्व करण्याची संधी देणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही च-होलीकरांनी दिली.
कोट
१९९७ मध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाला प्राधन्य देण्याची भूमिका आम्ही ठेवली. माजी महापौर नितीन काळजे यांच्या रुपाने पहिल्यांदा समाविष्ट गावांना मानाचे पद देण्याची संधी मिळाली. माजी महापौर राहुल जाधव हेसुद्धा या भागातून प्रतिनिधीत्व करीत होते. यासह स्थायी समिती, शहर सुधारण समिती, क्रीडा समिती अशा महत्त्वाच्या समितींवर या भागातील सहकाऱ्यांना संधी मिळाली. पायाभूत सोयी-सुविध सक्षम करता आल्या. त्यामुळेच आज ‘‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’’ विकसित झाला आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.