पुणे : माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट, पुणे आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस रविवारी सकाळी पु.ल. देशपांडे उद्यान मधील (मुघल उद्यान) सिंहगड रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाचे यंदा 10 वे वर्ष होते.
यावेळी मनाली देव (संस्थापक अध्यक्ष माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे ), आमोद देव ( हरितत चॅरिटेबल ट्रस्ट), स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रितम थोरवे, सचिव मेघश्याम देशपांडे, क्रीडा भारती मंत्री-विजय राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमा विषयी बोलताना मनाली देव म्हणाल्या, मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत, योगासनाच्या 50 मिनिटांच्या पारंपारिक सदरीकरणा नंतर आमच्या विद्यार्थ्यांनी आर्टिस्टिक योगाचे विविध प्रात्यक्षिके सादर केले.
या प्रसंगी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आणिका पेठे, आर्या इनमादार, रिया यादव, निहारिका गद्रे,सानिका केळकर, शरन्या देवकर,चिन्मयी केळकर, प्रिती अभ्यंकर रुचा कानिटकर, निकिता वाघमारे, आयुष देव यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली.