32.1 C
New Delhi
Sunday, April 12, 2026
Homeमहाराष्ट्रदादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!

दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!

म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून चंद्रकांतदादांचे आभार

दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!, अशा शब्दात म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून चंद्रकांतदादांप्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली. यावेळी चंद्रकांतदादांनी देखील सर्वांचे आभार मानत, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते अशी भावना व्यक्त केली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ व्हीटीपी ब्लेअर मधील सोसायटीच्या रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी देशात आणि राज्यात माननीय मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासाकामांची माहिती देऊन, भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी सोसायटीचे रहिवासी शिरीष भावसार यांनी दादांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतल्याचे कौतुक करताना दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले! यामुळे गरीब घरातील मुलींना उच्च शिक्षण घेणे सहज सोपे झाले आहे, अशी भावना व्यक्त केली. अशा प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना ना. पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, भाजप नेत्या जागृती विचारे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.1 ° C
32.1 °
32.1 °
25 %
5.1kmh
0 %
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
40 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments