30.1 C
New Delhi
Friday, April 17, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानअनंत नॅशनल युनिव्हर्सिटीनी यूसीईईडी २०२६ रँकधारकांसाठी १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती केली जाहीर

अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीनी यूसीईईडी २०२६ रँकधारकांसाठी १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती केली जाहीर

पुणे, : अनंत नॅशनल युनिव्हर्सिटी नी रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. एअर २५० पर्यंत रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. या अंतर्गत विद्यार्थ्यांची पूर्ण ट्युशन फी आणि होस्टेल फी माफ केली जाईल. तसेच एअर २५०० पर्यंत रँक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना या लाभ मिळू शकेल.

याशिवाय यूसीईईडी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत आणखी एक मोठी सोय मिळणार आहे. त्यांना एडीईपीटी प्रवेश परीक्षा देण्याची गरज राहणार नाही आणि थेट मुलाखतीची संधी दिली जाईल. हा मार्ग विद्यार्थ्यांच्या यूसीईईडी मधील मेहनत आणि गुणवत्तेची दखल घेत तयार करण्यात आला आहे. यामुळे डिझाईन क्षेत्रात क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक सोपी आणि स्पष्ट संधी उपलब्ध होईल.

अशी विशिष्ट योजना विद्यापीठाच्या व्यापक ध्येयाचा भाग आहे ज्यामध्ये आर्थिक परिस्थिती कोणतीही असली तरी प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार डिझाईन शिक्षण मिळावे, यावर भार दिला जातो. गुणवत्ताधारित शिष्यवृत्तीबरोबरच विद्यापीठाकडून गरजेनुसार आर्थिक मदतही दिली जाते. यात अंशतः ते पूर्ण ट्युशन फी माफीपर्यंत मदत दिली जाऊ शकते. ही मदत विद्यापीठाच्या आर्थिक सहाय्य समिती द्वारे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जशी की उत्पन्न, बचत, गुंतवणूक आणि शिक्षण कर्ज यांचा विचार करून ठरवली गेली जाते.

याबाबत बोलताना अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे चीफ फायनान्स अँड अकाउंट्स ऑफिसर आणि हेड, ऑफिस ऑफ ह्युमन रिसोर्सेस युवराजसिंह झाला म्हणाले, “अनंतच्या दृष्टी कोणाशी सुसंगतपणे आम्ही प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहोत. १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि निवासाची सुविधा देण्यामागचा उद्देश असा आहे की देशातील तेजस्वी विद्यार्थी डिझाईन क्षेत्राची निवड करतील, भविष्यातील कुशल व्यावसायिकांची नवी पिढी तयार होईल आणि या क्षेत्रातील दर्जाही उंचावेल.”

संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी विद्यापीठाकडून विशेष शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असून, या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाऊ शकते.

या सर्व उपक्रमांमधून अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचा एक स्पष्ट संदेश दिसून येतो तो म्हणजे दर्जेदार डिझाईन शिक्षण हे केवळ आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसावे. देशभरातील विविध आर्थिक, भाषिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना डिझाईन शिक्षण घेता यावे आणि भविष्यात अर्थपूर्ण करिअर घडवता यावे, यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
28 %
2.1kmh
40 %
Fri
40 °
Sat
41 °
Sun
40 °
Mon
41 °
Tue
42 °

Most Popular

Recent Comments