‘
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री रणजीत श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते फीत कापून नवीन आऊटलेटचे केले उद्घाटन
● नव्या ‘वॉक-इन’ ‘ ओरिजिन फ्रेश ‘ स्टोअर्समध्ये फळे, भाजीपाला, हायड्रोपोनिक उत्पादने, विदेशी उत्पादने आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे २५० हून अधिक प्रकार एसकेयू उपलब्ध असतील.
● अत्यंत ताजेतवानी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित साठा नियोजन आणि कंट्रोल्ड कोल्ड-चेन पायाभूत सुविधांची मदत.
● डीप वॉटर कल्चर तंत्रज्ञानामुळे अधिक पोषक, अवशेषमुक्त, अधिक ताजी आणि जास्त शेल्फ लाईफ असलेली हायड्रोपोनिक उत्पादने उपलब्ध.
● भारतातील उत्पादन क्षेत्रांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग असून, ओरिजिन फ्रेशला १०,००० हून अधिक छोट्या शेतकऱ्यांच्या नेटवर्कचा आधार असून कंपनीच्या संपूर्ण कार्यप्रणालीत उत्पादनाची नासाडी ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
पुणे, २० जून २०२६ : भारतातील प्रीमियम ताज्या फळभाज्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड ‘ओरिजिन फ्रेश’ने पुण्यातील कोरेगाव पार्क येथे पहिले स्टोअर सुरू करून पश्चिम भारतातील विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. बंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या कंपनीसाठी हा विस्तार महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रत्यक्ष स्टोअर्स, स्वतःचे अॅप आणि संकेतस्थळ तसेच क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी ‘ओम्नीचॅनल’ व्यवसाय मॉडेलवर कार्यरत आहे.
दर्जा, ताजेपणा आणि विचारपूर्वक खाद्यपदार्थांची निवड करण्यास प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून कोरेगाव पार्कची निवड करण्यात आली आहे. गतिमान जीवनशैली, जागतिक दृष्टीकोन आणि विकसित होत असलेल्या खाद्यसंस्कृतीसाठी ओळखला जाणारा हा परिसर ‘ओरिजिन फ्रेश’च्या गुणवत्ता-केंद्रित दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
” ओरिजिन फ्रेश’ च्या या रोमांचक नवीन वाटचालीसाठी मी संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. ‘ओरिजिन फ्रेश’ द्वारे मिळणारी गुणवत्ता, ताजेपणा आणि सोय पुणेकर नक्कीच पसंत करतील, याची मला खात्री आहे. शेतकरी वर्गाला आधार देत असतानाच ताजी फळे आणि भाज्या अधिक सहजपणे उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करणारा हा ब्रँड पाहणे उत्साहवर्धक आहे. ‘ओरिजिन फ्रेश’ चा पुणे आणि मुंबईमध्ये विस्तार व्हावा आणि अधिकाधिक कुटुंबांना ताजी व जबाबदारीने मिळवलेली उत्पादने घेता यावीत, अशी मी अपेक्षा करतो,” असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस श्री. रणजित श्रीकांत शिरोळे यांनी स्टोअरच्या उद्घाटनावेळी सांगितले.
या नव्या स्टोअरमध्ये २५० हून अधिक प्रकारची फळे, भाज्या आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू (एसकेयू) उपलब्ध आहेत. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शेतकरी भागीदारांकडून मिळणाऱ्या १५० हून अधिक विशेष आणि विदेशी उत्पादनांचा समावेश आहे. यांतील निवडक उत्पादनांमध्ये कोरियन पिअर्स, जपानी सन फुजी सफरचंद, कॉटन कँडी द्राक्षे, यलो ड्रॅगन फ्रूट आणि हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवलेले लेट्यूस यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. जागतिक रूची, आरोग्यदायी जीवनशैली आणि दर्जेदार घटकांवर आधारित खाद्यपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही उत्पादने आहेत.
‘ओरिजिन फ्रेश’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रशांत वासन म्हणाले, “पुणे हे आमच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. दर्जेदार, अस्सल आणि आरोग्यदायी अन्नपदार्थांना प्राधान्य देणारा ग्राहकवर्ग असलेले हे शहर आहे. कोरेगाव पार्क हा विशेषतः ‘ओरिजिन फ्रेश’च्या आधुनिक ग्राहकांचा, आपण जे सेवन करतो त्याविषयी सजग असलेल्या आणि सर्वोत्तम तेच हवे असलेल्या ग्राहकांचा परिसर असल्याने आमच्या विस्तारासाठी तो आदर्श ठरतो. पुणे ही आमच्या पश्चिम भारतातील विस्ताराची पहिली पायरी असून या भागात मोठ्या प्रमाणावर वाढीची संधी आम्हाला दिसत आहे.”
‘ओरिजिन फ्रेश’ ही ताज्या प्रीमियम उत्पादनांचा पुरवठा करण्याच्या कटिबद्धतेवर आधारित असून ती पाच टप्प्यांच्या कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेचे पालन करते. यामध्ये सोर्सिंग, ग्रेडिंग, हाताळणी, साठवण आणि वितरण यांचा समावेश आहे. कंपनी डीप वॉटर कल्चर (डीडब्ल्यूसी) तंत्रज्ञानाद्वारे हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवलेली, अवशेषमुक्त, अधिक ताजी आणि जास्त काळ टिकणारी उत्पादनेही उपलब्ध करून देते.
याच्या जोडीला ‘ओरिजिन फ्रेश’चे अॅप ग्राहकांना ताजी, विदेशी, हायड्रोपोनिक आणि दैनंदिन वापरातील उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देते. तसेच ‘रायपनेस कोटियंट’ हे या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य असून या विशेष सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या पिकण्याच्या अवस्थेनुसार आणि वापराच्या वेळेनुसार फळांची निवड करता येते.
ओरिजिन फ्रेशची स्टोअर्स सध्या बंगळुरू, म्हैसूर, चेन्नई आणि पुणे येथे कार्यरत असून, येत्या काही महिन्यांत किरकोळ विक्री विस्तार करण्यासाठी आणखी गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे.


