29.2 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रदिव्यांग भवन फाऊंडेशन येथे मतदान जनजागृती

दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे मतदान जनजागृती

थेरगाव, – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मोरवाडी येथील

 चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम सुरु आहेत.

मोरवाडी येथील दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे झालेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमास स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी राजीव घुले, दिव्यांग भवनाचे व्यवस्थापक संचालक ओमप्रकाश देशमुखे यांच्यासह स्वीप टीमचे सदस्य दिपक यन्नावार, अंकुश गायकवाड, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग, विजय वाघमारे, संजू भाट तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि दिव्यांग नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित दिव्यांग नागरिकांनी मतदानाची शपथ घेतली.

लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विकासाला चालना तसेच गती मिळण्यास भरीव मदत

लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विकासाला चालना तसेच गती मिळण्यास भरीव मदत होते. याच दृष्टिकोनातून देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी केले.
२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कामगार भवन, थेरगाव येथे बीएलओ प्रशिक्षणाचे औचित्य साधून मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास नायब तहसिलदार श्वेता आल्हाट, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी आणि २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्वीप टीमचे नोडल अधिकारी राजीव घुले व स्वीप टीमचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले तसेच देशहितासाठी मतदान करा असा संदेश देण्यात आला. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान प्रतिज्ञा घेतली.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देणे आवश्यक असून त्यांना मतदान करण्यास जागृत करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
3.2kmh
18 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!