पुणे- प्रख्यात आध्यात्मिक गुरु व लेखक सरश्री यांनी लिहलेल्या द मिरॅकल ऑफ ग्रॅटिट्यूड (कृतज्ञतेची किमया) या मराठी पुस्तकाचे प्रकाशन एफ. सी. कॉलेज येथील पुणे पुस्तक महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे, महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनचे डॉ. संप्रसाद विनोद, विश्वशक्ती इंटरनॅशनल फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. दत्ता कोहिनकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू नितीन कळमकर आणि तेजज्ञान फाऊंडेशनचे विश्वस्थ डॉ. मकरंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले.राजेश पांडे म्हणाले की द मिरॅकल ऑफ ग्रॅटिट्यू या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होताना मला आनंद होतोय. त्यापेक्षा मला जास्त आनंद याचा होतोय की हे पुस्तक पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशित झाले. ते पुढे म्हणाले की संपूर्ण विश्वाला शांततेची आणि ज्ञानाची अत्यंत गरज आहे. सरश्री आणि हॅपी थॉट्स यांच्या विषयी मला माहीत आहे. त्यांचे कार्य आणि समाजातील योगदान वाखाणण्याजोगे आहे. येथील लोकांचे प्रसन्न चेहरे पाहून या सेवाभावी संस्थे सोबत मी लवकरच जोडला जाणार आहे. अशी भावना राजेश देशपांडे यांनी व्यक्त केली. कोहिनकर म्हणाले की विश्वात आयुष्य जगत असताना अध्यात्मा शिवाय जगणं खूप अवघड असतं. लाखो लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता प्रख्यात वक्ते व प्रगल्भ लेखक सरश्री यांच्या विचारात आहे. त्यांनी उभा केलेला जनसमुदाय जगभरात कार्यरत आहे. आपल्यामध्ये नेहमी कृतज्ञतेची भावना रुजणे महत्वाचे आहे. कृतज्ञतेची किमया हे पुस्तक समाजात सकारात्मक बदल घडवेल.डॉ. संप्रसाद म्हणाले की सरश्री यांनी तेजज्ञान फाऊंडेशनची स्थापना केली असून त्यांनी समजात सकारात्मक विचारांचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यांनी ज्ञानाची एक अनोखी प्रणाली तयार केली आहे. तेजज्ञान फाऊंडेशनची स्थापना ही, समाजात “आनंदी विचार” पसरवण्यासाठी पुस्तके, प्रवचन आणि अध्यात्मिक ज्ञान हे स्टेप बाय स्टेप दिले जाते. तेजज्ञान फाऊंडेशनने या पुस्तकाची निर्मिती केली असून वॉव प्रकाशन तर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
द मिरॅकल ऑफ ग्रॅटिट्यू या पुस्तकाचे प्रकाशन
संपूर्ण विश्वाला शांततेची आणि ज्ञानाची अत्यंत गरज - राजेश पांडे
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
29
°
C
29
°
29
°
32 %
3.5kmh
0 %
Fri
29
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°