25.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवडमध्ये ‘लो इमिशन झोन’साठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला सुरुवात

पिंपरी चिंचवडमध्ये ‘लो इमिशन झोन’साठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला सुरुवात

स्वच्छ हवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

पिंपरी, : पिंपरी चिंचवड महापालिका आणि ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या सहकार्याने ‘कमी उत्सर्जन क्षेत्र’ (लो इमिशन झोन्स – LEZ) धोरणाच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक कार्यशाळेला आज औपचारिक सुरुवात झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि ब्रिटिश उच्च उपायुक्त जेमी स्कॅटरगुड यांच्या हस्ते झाले.

जागतिक अनुभव, स्थानिक अंमलबजावणी

ही कार्यशाळा २ ते ६ जून २०२५ या कालावधीत पार पडणार असून, ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे तज्ज्ञ महापालिकेला व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत. कार्यशाळेत नियोजन, अंमलबजावणी, जनजागृती, तंत्रज्ञान आणि हितधारक संवाद यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. लंडनमधील अल्ट्रा लो इमिशन झोनच्या (ULEZ) यशस्वी अनुभवावर आधारित हे सत्र राबवले जात आहे.

कार्यशाळेत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, ब्रिटिश उच्च आयोगाचे प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे तज्ज्ञ, वाहतूक व प्रदूषण नियंत्रण क्षेत्रातील विविध अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले आहेत. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक स्तरावरील शाश्वत वाहतूक उपाययोजना आणि स्वच्छ हवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.

लो इमिशन मोबिलिटी झोन धोरणाला बळ

महापालिकेच्या ‘लो इमिशन मोबिलिटी झोन्स’ (LEMZ) धोरणाअंतर्गत २०२६ पर्यंत निवडक भागांमध्ये केवळ BS-6 आणि इलेक्ट्रिक वाहनेच वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील वायुप्रदूषणात मोठी घट होईल, अशी अपेक्षा आहे. कार्यशाळेत वायुप्रदूषण मोजणी, जनजागृती मोहिमा, तांत्रिक अंमलबजावणी, नागरी सहभाग, नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टचा समावेश, आणि सार्वजनिक वाहतूक सुविधांशी सुसंगत संलग्नन यावर भर दिला जाणार आहे.

हा उपक्रम यूके-इंडिया पार्टनरिंग फॉर एक्सलरेटेड क्लायमेट ट्रान्झिशन (UK PACT) निधीच्या माध्यमातून राबवला जात आहे. महापालिकेच्या ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅन’मध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे.

शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका) यांचा संदेश

“पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक उपाययोजनांसाठी एक व्यापक प्रणाली तयार करण्यात येत आहे. ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे तांत्रिक सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शहरातील कमी प्रदूषण क्षेत्रे प्रभावीपणे निश्चित करून, नियोजन राबवता येईल.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

जेमी स्कॅटरगुड (ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई) यांचा संदेश

“स्वच्छ आणि आरोग्यदायी शहरे निर्माण करण्यासाठी ब्रिटन आणि भारत सरकार दोघांची समान प्राथमिकता आहे. ही कार्यशाळा जागतिक हवामान कृतीसाठी स्थानिक पातळीवरील भागीदारीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.”
– जेमी स्कॅटरगुड, ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई

पुढील वाटचाल

पुढील चार दिवसांत कार्यशाळेत कमी उत्सर्जन क्षेत्र धोरणाची शहरी विकासाशी सांगड, इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट, नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टचा समावेश, आणि सार्वजनिक वाहतूक सुविधांशी प्रभावी संलग्नन यावर सखोल चर्चा होणार आहे. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छ हवा आणि शाश्वत वाहतूक साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत बदल घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.7 ° C
25.7 °
25.7 °
87 %
4kmh
100 %
Mon
30 °
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!