पुणे -दसऱ्याच्या दिवशी पुणे पोलीस दलात मोठा बदल झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने सात पोलीस ठाणी दसऱ्यापासून सुरु झाली आहे. शनिवारी सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.पुण्यातील नवीन झालेल्या सात पोलीस स्टेशनला नवनियुक्त पोलीस वरिष्ठ निरीक्षक मिळाले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणीस अन् पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केल्यानंतर दसऱ्यापासून या पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरु झाले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयात दहा वर्षांनंतर बदल झाला आहे. आता आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही सात पोलीस ठाणे सुरू झाली आहे. यामुळे इतर मोठ्या पोलीस ठाण्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.
पुणे शहरात सात पोलीस ठाणी सुरु झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पुणे पोलीस दलात ८१६ पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या इमारत उभारणीसाठी निधी मंजूर केला आहे. सात पोलीस ठाण्यांच्या इमारतीसाठी एकूण ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नव्या इमारत उभारणीसाठी २५ कोटी रूपये मंजूर केले आहेत.
* कोणत्या पोलीस ठाण्यावर कोणाची नियुक्ती-
-शरद झीने आंबेगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर.
-अतुल भोस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड सिटी.
-महेश बोलकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर.
-संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी.
-पंडित रजेतवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली.
-मंगल मोढवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी.
-मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ.