21.1 C
New Delhi
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रबायोडायव्हर्सिटी पार्क'मुळे तळवडेचे नाव राष्ट्रीय स्तरावर!

बायोडायव्हर्सिटी पार्क’मुळे तळवडेचे नाव राष्ट्रीय स्तरावर!

 ग्रामस्थ म्हणतात… “आमच्या भविष्यासाठी तुम्ही आमदार होणे महत्त्वाचे”
– महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या पदयात्रेला प्रतिसाद

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणारा ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) तळवडे येथे विकसित होत असल्यामुळे एकीकडे निसर्गाचे मूळ स्वरूप अबाधित राहणार आहे. शिवाय या प्रकल्पातून तळवडे आणि आसपासच्या गावांचे आर्थिक परिमान बदलणार आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर गावची ओळख निर्माण होणार आहे. अशा प्रकल्पातून गावाची उन्नती, प्रगती आणि भरभराट करून देणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा असल्याचा विश्वास तळवडे ग्रामस्थांनी व्यक्त केला.

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली तळवडेतील प्रभाग क्रमांक 11 आणि 12 येथे पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी या भावना व्यक्त केल्या.

सुदर्शननगर, कोयनानगर, फुलेनगर, शिवाजी पार्क, स्वामी समर्थ कॉलनी, त्रिवेणी नगर, टॉवर लाईन, ताम्हाणे वस्ती येथील श्रीकृष्ण सोसायटी, गणेश सोसायटी, हनुमान सोसायटी, अजिंक्यतारा सोसायटी दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी करत आमदार महेश लांडगे यांना  विजयाच्या ‘हॅट्रिक’ च्या शुभेच्छा दिल्या. आपल्या हॅट्रिकच्या माध्यमातून आमच्या भागाचा विकास होणार आहे. दृष्टिक्षेपात आलेली कामे रखडू नये. यासाठी तुमचे आमदार होणे आमच्या गावाच्या भल्यासाठी आहे, अशा भावना देखील जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, सोसायटीधारक यांनी पदयात्रेसाठी पुढाकार घेतला.


शास्तीकर माफीमुळे मोठा दिलासा…
काँग्रेस आघाडी सरकारने लादलेला शास्तीकर सरसकट माफ करून या भागातील नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. आमच्या मानगुटीवर बसलेले शास्तीकराचे भूत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातूनच उतरले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे चिखली तळवडेतील नागरिकांनी ठरवले आहे.


मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी काळजीपूर्वक लक्ष दिले आहे. अंतर्गत रस्ते, पाणी यांच्या सुविधा पुरविण्याच्या महापालिकेकडे पाठपुरावा केला. चिखली-तळवडेत पर्यायी सात रस्ते विकसित होत आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. वीज व्यवस्थेचा खोळंबा दूर केला आहे.  वीज वितरणची अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. तसेच येत्या काळात ट्रान्सफॉर्मरची देखील कामे प्रस्तावित आहेत. मुख्य म्हणजे तळवडेतील बायोडायव्हर्सिटी पार्क हे पूर्णत्वाला नेणे महत्त्वाचे काम असणार आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा. उमेदवार भाजपा महायुती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
21.1 ° C
21.1 °
21.1 °
46 %
2.1kmh
0 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!