17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रभोसरी मतदार संघातील वीजविषयक कामांना ‘‘बुस्टर’’

भोसरी मतदार संघातील वीजविषयक कामांना ‘‘बुस्टर’’

  • जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी २२ लाखांच्या कामांना मंजुरी
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातील वीज विषयक विविध कामांसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे ३ कोटी २२ लाख रुपयांच्या विविध कामांना व उपकरणे खरेदीला मंजुरी मिळाली आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

भोसरीसह समाविष्ट गावांमध्ये वीज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी आमदार लांडगे यांनी सातत्त्याने पाठपुरावा केला आहे. भोसरी शाखेचे विभाजन, नवीन उच्चदाब केंद्र, नवीन रोहित्र उभारणी अशा कामांना यापूर्वीच राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यादृष्टीने मनुष्यबळ निर्मितीही करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चिखली आणि परिसरात ३१५ KVA चा रोहित्र ६३० Kva करून क्षमता वाढविणे, विद्युत वाहिनी भूमिगत करणे, विद्युत वाहिनीस पर्यायी केबल टाकणे, नवीन फीडरपिळ बसवणे, जुन्या निष्क्रिय झालेल्या वीजवाहिनी बदलणे अशी कामे करण्यात येणार आहेत. तसेच दिघी व परिसरात येथे विद्युत वाहिनी भूमिगत करणे, चऱ्होली परिसरात विद्युत वाहिनी भूमिगत करणे, जुन्या निष्क्रिय झालेल्या विद्युत वाहिनी बदलणे, जाधववाडी येथे रोहित्र स्थलांतरित करणे, मोशी येथे ६३० Kva चा नविन रोहित्र उभारणी करणे, इंद्रायणीनगर, भोसरी येथे नवीन फीडरपिलर बसवणे, नवीन फीडरपिलर बसवणे, कृष्णानगर परिसरात जुन्या निष्क्रिय झालेल्या विद्युत वाहिनी बदलणे, गणेशनगर तळवडे येथे नवीन वीजवाहिनी टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.


‘या’ परिसराला होणार फायदा..!
सोनवणे वस्ती, चिखली, राम मंदिरा मागे चिखली, गाथा कॉलनी चिखली, संविधान कॉलनी पाटीलनगर चिखली, विकास आश्रम, चिखली गावठाण दत्त मंदिर, चिखली भाग, सोनवणेवस्ती चिखली, संभाजी नगर विभाग, शेलार वस्ती चिखली, आंबेडकरभवन चिखली, गजानन महाराज नगर दिघी, साई पार्क माऊली नगर दिघी, उत्सव होम आझाद नगर चोविसावाडी चर्होली, चर्होली विभाग, गंधर्व नगरी रो हौउस
शिवक्लासिक सोसा. शिवाजीवाडी, मोशी, बोलाई मळा जाधववाडी, लांडगे नगर भोसरी, भोसरी गाव परिसर, इंदायणी नगर परिसर, नाशिक रोड विभाग, स्पाईन रोड, कृष्णा नगर, गणेश नगर तळवडे आदी भागात नव्याने वीज विषयक कामे होणार आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सक्षम व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.



भोसरी विधानसभा मतदार संघातील वीज विषयक समस्या मार्गी लावण्याबाबत आम्ही सातत्त्याने पाठपुरावा करीत आहोत. राज्याच्या विधिमंडळ सभागृहात याबाबत सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे भोसरी शाखेचे विभाजन, नवीन उच्चदाब केंद्र निर्मितीचा निर्णय झाला. महावितरण इन्फ्र- २ मधील कामांसाठीही आम्ही आग्रही आहोत. वीजग्राहक, उद्योजक यांना भेडसावणारी समस्या निकालात काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लागत आहेत, याचे समाधान आहे. प्रशासनाने सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी सूचना केली आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!