मुंबईः राज्यात आज सरासरी ६५ टक्के मतदान झाले. १९९५ नंतर प्रथमच एवढे मतदान झाले. असे असले, तरी राज्यांत या वेळी कधी नव्हे, एवढे मतदानात गैरप्रकार झाले. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत हाणामारी झाली. पैसे वाटपाचे आरोप झाले. बारामतीपासून चंद्रपूरपासून सर्वत्र असे प्रकार घडले. उमेदवाराला मारहाण झाली. मतदान फोडण्याचे प्रकार घडले. मतदानानंतर झालेल्या मिरवणुकीवरूनही राडे झाले. २०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. आता फक्त तासभरच वेळ उरला असून सहा वाजता मतदान केंद्रांचे गेट बंद केले जाणार आहे. यानंतर आतमध्ये असलेल्या मतदारांचेच मतदान घेतले जाणार आहे. या तासाभरात हा आकडा साठच्या वर जाणार आहे हे नक्की झाले आहे. गेल्या वेळी २०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झालेच तर जादाचे झालेले हे मतदान कोणाच्या पारड्यात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात की सत्ताधाऱ्यांच्या बाजुने असेल याचे अंदाज लावले जाणार आहेत.
गडचिरोली जिल्हा ७० टक्के मतदानाच्या अगदी जवळ पोहोचला आहे, तर त्यापाठोपाठ भंडारा ६५.८८ आणि गोंदिया ६५.०९ चा नंबर लागत आहे. हिंगोली जिल्ह्यानेही ६१.१८ चा आकडा गाठला आहे. जालना ६४.१७ टक्के, कोल्हापूर ६७.९७ टक्के, नंदुरबार जिल्हा ६३.७२, परभणी ६२.७३ टक्के, रायगड ६१.०१, सांगली ६३.२८, सातारा ६४ टक्के, सिंधुदुर्ग ६२ टक्के, वर्धा ६३.५०, यवतमाळ ६१.२२ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यांत मुंबई, ठाणे आणि पुणेकरांचा समावेश आहे. ठाणे ४९.७६, मुंबई शहर ४९.०७, मुंबई ५१.७६, पुणे ५४.०९ या जिल्ह्यांत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. असे असले तरी बहुतांश मतदारसंघांत चांगले मतदान झाले आहे.